मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. काही दिवसांपूर्वीच दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रसाद व अमृता दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. निरनिराळे फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आता लग्नानंतर पहिल्यांदाच प्रसादने अमृतासाठी खास पदार्थ बनवला आहे. अमृताने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रसाद व अमृता अनेकदा पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम जाहीर करीत असतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीतच दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. दोघांनी लग्नाच्या संगीत, हळद, लग्न, त्यानंतर घरातील गृहप्रवेश, पूजा आदी कार्यक्रमांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. आता लग्नानंतर प्रसादने अमृतासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे. या डिशचा फोटो अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. प्रसादने फरसबी, मटार, फुलकोबी, गाजर, दही, मेयोनीज, उकडलेले अंडे यांपासून एक पदार्थ बनवला आहे. हा फोटो शेअर करीत अमृताने त्याला ‘आरोग्यदायी जेवण’ अशी कॅप्शन दिली आहे. तसेच तिने प्रसादकडे “शेफ, कृपया ही रेसिपी शेअर करा”, अशी मागणीही केली आहे.
याअगोदरही अनेकदा प्रसादने अमृतासाठी निरनिराळे पदार्थ बनवले होते. अमृताने आपल्या मुलाखतीमध्ये अनेकदा प्रसाद कसं चांगलं जेवण बनवतो हे सांगत त्याचे कौतुक केले होते. अमृता म्हणालेली, “प्रसाद खूप चांगलं जेवण बनवतो. पण मला स्वयंपाकाची म्हणावी तशी आवड नाहीये. त्याला सगळंच येतं. तो घरही खूप चांगलं अन् नीटनेटकं ठेवतो.”
हेही वाचा-
‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात प्रसाद आणि अमृता सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे जाऊन या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जुलै महिन्यात प्रसाद आणि अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रसाद अन् अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर अमृताचे ‘नियम व अटी लागू’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि प्रसाद जवादे शेवटचा काव्यांजली या मालिकेत झळकला होता.