‘बडे अच्छे लगते हैं’ फेम राम कपूर खूप लोकप्रिय आहे. या मालिकेत राम व साक्षी तंवर यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. या मालिकेतील दोघांच्या अप्रतिम केमिस्ट्रीने पडद्यावर वेगळीच छाप सोडली. या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आणि आघाडीचा टीव्ही अभिनेता झाला. राम कपूर २० वर्षांहून जास्त काळापासून अभिनयक्षेत्रात आहे. त्याने फक्त टीव्हीवरच नाही तर बॉलीवूडमध्येही काम केलं आहे.

राम कपूरच्या पत्नीचं नाव गौतमी आहे. राम महाराष्ट्राचा जावई आहे. त्याची पत्नी गौतमी गाडगीळ ही मराठी आहे. तिने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राम व गौतमी यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

Ratan Tata, RK Laxman, Ratan Tata letter of thanks,
रतन टाटांनी आर. के. लक्ष्मण यांना पाठवलेल्या आभार पत्राची चर्चा
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
documentary, drama, documentary latest news,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : तिसरा डोळा…
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
woman arrested from mp for stealing valuable watch from actress house
अभिनेत्रीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेला मध्यप्रदेशातून अटक
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन

गौतमी व राम कपूर यांची पहिली भेट

Gautami Gadgil Ram Kapoor Love Story: गौतमी व राम कपूर यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. कारण दोघेही एकाच मालिकेत काम करत होते. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत राम कपूर दीर तर गौतमीने त्याच्या वहिनीची भूमिका केली होती. ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवरच गौतमी आणि राम एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. रामशी लग्न करण्यापूर्वी गौतमीचं लग्न फोटोग्राफर मधुर श्रॉफशी झालं होतं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते विभक्त झाले. यानंतर गौतमीच्या आयुष्यात राम आला.

१४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री, पतीनेही केलंय दुसरं लग्न

घरच्यांचा विरोध पत्करून लग्न

राम कपूर व गौतमी यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध झाला होता. कारण राम कपूर पंजाबी कुटुंबातून येतो, तर गौतमी मराठी आहे. तिचं माहेरचं नाव गौतमी गाडगीळ आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. दोघांच्या नात्याबद्दल घरी कळाल्यावर ते नाराज झाले, गौतमी व रामच्या लग्नासाठी ते तयार नव्हते. त्यामुळे या जोडप्याने मंदिरात लग्न केलं होतं. त्यांनी १४ फेब्रुवारी २००३ रोजी लग्न केलं होतं. त्यांना सिया व अक्स ही दोन अपत्ये आहेत.

Gautami Ram Kapoor Family
गौतमी व राम कपूर यांचे कुटुंब (फोटो – इन्स्टाग्राम)

नव्या नवेली नंदाने घेतला IIM Ahmedabad मध्ये प्रवेश, तिच्या कोर्सची फी किती? जाणून घ्या

राम कपूर करिअर

राम कपूरच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झाल्यास त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘लिपस्टिक’, ‘कहता है दिल’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या त्याच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. ‘बडे अच्छे लगते है’ ही त्याची सर्वाधिक लोकप्रिय मालिका राहिली. टीव्हीबरोबरच त्याने बॉलीवूडमध्येही काम केलं आहे. ‘कुछ ना कहो’, ‘फना’, ‘उडान’, कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘एजंट विनोद’ आणि ‘हमशक्ल’ या सारख्या चित्रपटात राम कपूरने भूमिका केल्या.