ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांचं हृदय बंद पडल्याने सोमवारी (१९ फेब्रुवारी रोजी) निधन झालं. त्यांच्यावर आज ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय व त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी साश्रूनयनांनी ऋतुराज सिंह यांना अखेरचा निरोप दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋतुराज सिंह यांच्या अंत्यदर्शनाला नकुल मेहता, अर्शद वारसी, अनुप सोनी, हितेन तेजवानी, रझा मुराद यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या घरी कलाकारांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर ओशिवरामध्ये हिंदू स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ऋतुराज सिंह अनंतात विलीन झाले आहेत. ऋतुराज यांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदय बंद पडल्याने निधन

सोशल मीडियावर ऋतुराज सिंह यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ऋतुराज काही दिवसांपूर्वीच ‘अनुपमा’ मालिकेत दिसले होते. त्यानंतर ते सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये रफिक नावाच्या भूमिकेत झळकले होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Video: अभिनेते ऋतुराज सिंह यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले कलाकार, साश्रूनयनांनी वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, ऋतुराज सिंह यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी ऋतुराज यांनी ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा अनेक शोमध्ये काम केलं होतं. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते २’, ‘थुनिवू’, ‘जर्सी’, ‘हम तूम और घोस्ट’ या चित्रपटात काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor rituraj singh last rites performed family friends got emotional hrc
First published on: 21-02-2024 at 14:50 IST