एखादा कलाकार चित्रपट सोडून जातो याची चर्चा सगळीकडे होते मात्र टीव्ही विश्वात हे नवे नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील मालिका मागील १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी ही मालिका सोडली. या मालिकेत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी जेव्हा ही मालिका सोडली तेव्हा प्रेक्षकांना धक्का बसला. याहून धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

शैलेश लोढा यांना मालिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळत होती. त्याच्या खुमासदार सुत्रसंचालनामुळे अनेकजण हा कार्यक्रम बघत होते. समोर आलेल्या माहितीनुसार शैलेश लोढा यांना मालिका सोडल्यापासून त्यांचे मानधन मिळालेले नाही. हिंदुस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार शैलेश लोढा यांना वर्षभरापासून पैसे दिले गेले नाहीत. मालिकेच्या निर्मात्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये मालिका सोडली होती.

Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
no affair clause for Yeh Rishta Kya Kehlata Hai
सह-कलाकारांशी अफेअर करता येणार नाही, ‘या’ मालिकेच्या निर्मात्यांनी करारावर घेतली सही, अभिनेत्याने दिली माहिती
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

Video : “कोकण आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे…” रुचिरा जाधवचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

शैलेश लोढा यांनी सिद्धार्थ कननच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी मालिका सोडण्याबद्दल असे सांगितले की ‘गेली १४ वर्ष मी मालिकेत होतो. या मालिकेबद्दल मी खूप भावुक आहे. मी रोज सेटवर जायचो, काम करायचो. मी तसा कोणाची वाट बघणारा नाही मात्र या मालिकेसाठी मी वाट बघितली. माझा नाईलाज होता, मी एक दिवस सांगणार आहे मी मालिका का सोडली आहे ते, योग्य वेळेची मी वाट बघत आहे’. शैलेश आणि या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यामध्ये वाद झाल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला असेही बरेचसे लोक म्हणत होते.

शैलेश लोढा मालिकेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहता भूमिका साकारत आहे. शैलेश लोढा अभिनयासह लेखनदेखील करतात. त्यांना कविता करायचा छंद आहे. त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम वर्षभर सुरु असतात. शैलेश लोढा मूळचे जयपूरचे आहेत. या मालिकेसाठी त्यांनी मुंबई गाठली होती.