scorecardresearch

शालिन भानोत चित्रीकरणादरम्यान जखमी, चाहते काळजीत

त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.

shalin bhanot

बिग बॉस हिंदीचं सोळावं पर्व काही दिवसांपूर्वीच संपलं. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन हा या पर्वाचा विजेता ठरला. या कार्यक्रमातील टॉप ५ स्पर्धकांची चांगलीच चर्चा रंगली. यातील एक होता शालिन भानोत. गेले काही दिवस त्याच्या कारणांमुळे चर्चेत आहे. आता अशातच ‘बेकाबू’ या मालिकेच्या सेटवर त्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

शालिन सध्या त्याच्या ‘बेकाबू’ या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. तर आता याच मालिकेच्या सेटवर शूटिंग करत असताना तो जखमी झाला आहे.

आणखी वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

शालिन एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत होता, त्यावेळी तो जखमी झाला. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत असंही समोर आलं आहे. तसं असलं तरीही त्याने शूटिंग थांबवलं नाही. तो जखमी अवस्थेत चित्रीकरण करत राहिला. शालिन सध्या दिवस-रात्र या मालिकेचं चित्रीकरण करत आहे. स्वतःला आवश्यक आहे तितकीही विश्रांती न घेता तो याचं शूटिंग करत आहे. पण अद्याप शालिनने किंवा या मालिकेच्या टीमने याबाबत कोणतही वक्तव्य केलेलं नाही.

हेही वाचा : शालीन भानोतच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण, म्हणाली…

शालिन सेटवर जखमी झाल्यास कळवताच त्याचे चाहते त्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्याला आराम करण्याचाही सल्ला होता आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 11:11 IST