Premium

“झुकेगा नही हा संवाद नव्हता…” ‘पुष्पा’ चित्रपटाबद्दल श्रेयस तळपदेचा मोठा खुलासा; म्हणाला…

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली होती

shreyas talpade 3
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट जेव्हा हिंदीत डब करण्यात आला तेव्हा मराठमोळ्या श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनच्या भूमिकेला आवाज दिला होता. या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. याबद्दलच श्रेयसने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस तळपदे मराठीतीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीतीत त्याने डबिंगबद्दल भाष्य केलं आहे. तो असं म्हणाला “पुष्पा’साठी डबिंग करताना आम्ही अनेक सुधारणा केल्या होत्या. मुळात अल्लू अर्जुनच्या प्रसिद्ध डायलॉगचे भाषनंतर पुष्पा जायेगा नहीं’ असे होते. पण ते अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी आम्ही ते ‘पुष्पा झुकेगा नही’ बनवले आणि पुढची गोष्ट तुम्हाला माहीत आहे.”

जबरा फॅन! पाकिस्तानी कलाकाराने समुद्रावरील वाळूवर तयार केलं शाहरुख खानचं चित्र; बघून तुम्हीपण थक्क व्हाल

तो पुढे असं म्हणाला तसेच “फ्लॉवर नही फायर है मैं’ हा आयकॉनिक डायलॉग मूळ चित्रपटात अस्तित्वात नव्हता. आम्ही तो हिंदी डब व्हर्जनमध्ये सुधारित केला आणि वर्षभरानंतरही लोक त्याचा संदर्भ घेताना दिसतात. शाब्दिक भाषांतराऐवजी, आम्ही त्यात सुधारणा करतो त्यामुळे पात्राचे सार टिकवून ठेवता येते. तसेच प्रेक्षकांच्या लक्षातदेखील राहते.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

‘पुष्पा’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा दिग्दर्शक सुकुमार यांनी केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनाही ‘पुष्पा २’बद्दल आतुरता होती. ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. २०२४च्या मार्च-एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. पहिल्या भागाप्रमाणे यामध्ये अल्लू अर्जुन बरोबरच फहाद फाजिल, रश्मिका मंदाना दिसणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 15:21 IST
Next Story
“अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना…” निवेदिता सराफ यांची भावूक पोस्ट