Premium

“मी असेच राहणार, मला…”; लिव्ह इनमध्ये राहताना सखी-सुव्रतमध्ये झालं होतं भांडणं, अभिनेत्याने सांगितला किस्सा

२०१९ मध्ये सखी आणि सुव्रतने लग्नगाठ बांधली. पण त्याअगोदर काही काळ ते लिव्हइनमध्ये होते.

sakhi and suvrat
लिव्ह इनमध्ये राहत असताना सखी आणि सुव्रतमध्ये झालं होतं भांडण

अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे दोघेही प्रसिद्धीझोतात आले. मालिकेत एकत्र काम करताना त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१९ मध्ये सखी आणि सुव्रतने लग्नगाठ बांधली. पण लग्नाअगोदर काही काळ दोघं लिव्हइनमध्ये होते. दरम्यान दोघांमध्ये अनेकदा भांडण झाली होती. एका मुलाखतीत सखी आणि सुव्रतने याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘उंच माझा झोका’ने लोकांपर्यंत पोहोचवलं पण…”, छोटी रमा साकारणाऱ्या तेजश्रीचा करिअरबद्दल खुलासा, म्हणाली…

सखी आणि सुव्रतने नुकतचं एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्यावेळी दोघांनी लिव्ह इनमध्ये राहत असताना झालेल्या भांडणाचा किस्सा सांगितला आहे. सखी म्हणाली, “एकदा सुव्रतने कपडे अस्ताव्यस्त टाकले होते. मी त्याला म्हणाले हे कपडे इकडे का पडले आहेत. त्यावर तो म्हणाला मला इथेच आवडतात असं म्हणत त्याने ते कपडे घरभर विस्कटले. तेव्हा तो म्हणालेला मला असच राहायचं आहे. मला बेसिस्त आणि घाणीत राहायचं आहे.”

सुव्रत म्हणाला, “जेव्हा मला रिलॅक्स व्हायच असतं तेव्हा मी विचार नाही करत मी हा टिशर्ट काढून फेकून दिला आहे. मला असं वाटतं की ही माझी जागा आहे. हे माझं घर आहे. इथे मी पसारा नाही करु शकत तर कुठे करु शकतो. कारण कामाच्या ठिकाणी आपण पसारा करत नाही. मला हे नव्यान कळालं की आवरण म्हणजे गोष्टी उचलून बेडखाली टाकण नसतं. आवरणं म्हणजे त्याची घडी करुन जागेवर ठेवणं.”

हेही वाचा- “सचिन पिळगावकरांबरोबर काम करताना…,” वैदेही परशुरामीने सांगितला अनुभव, वैशाली सामंत, आदर्श शिंदेंचा उल्लेख करत म्हणाली…

दोघांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर , ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेनंतर सखी आणि सुव्रतने पहिल्यांदा एकत्र काम केलं. त्यानंतर दोघे ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात एकत्र दिसले होते. नुकतीच सुव्रतची ‘ताली’ ही हिंदी वेबसिरीज प्रदर्शित झाली. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनची मुख्य भूमिका आहे. यामध्ये सुव्रतने तृतीयपंथीची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor suvrat joshi revel he and his wife sakhi gokhale fight while staying in the living dpj

First published on: 26-09-2023 at 17:41 IST
Next Story
‘उंच माझा झोका’ने लोकांपर्यंत पोहोचवलं पण…”, छोटी रमा साकारणाऱ्या तेजश्रीचा करिअरबद्दल खुलासा, म्हणाली…