‘प्रेमाची गोष्ट’ ही नवीन मालिका नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंसनाळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तेजश्री आणि राज यांच्या केमिस्ट्रीबद्दल आता अपूर्वाने प्रतिक्रिया दिली आहे. आणखी वाचा : “मी कोण आहे हे माहित नसताना त्यांनी…”, तेजश्री प्रधानने सांगितला तिला अमरावतीला आलेला अनुभव प्रेमाची गोष्ट या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका सलग दोन आठवडे टीआरपीच्या यादीत प्रथम क्रमांकावर होती. तेजश्री आणि राज यांच्या केमिस्ट्रीला ही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. तर नुकतीच या मालिकेत अपूर्वाची एन्ट्री झाली. या मालिकेतील तिच्या कामाचंही प्रेक्षक कौतुक करत आहेत. हेही वाचा : दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या तेजश्री प्रधानचं शिक्षण किती ते माहीत आहे का? घ्या जाणून… सध्या या मालिकेमध्ये तेजश्री आणि राज यांच्यात वाद आणि मतभेद होताना दिसत आहेत. पण त्या दोघांचं एकमेकांशी असं वागणं प्रेक्षकांना आवडत आहे. तर त्यांच्यातल्या या केमिस्ट्रीची अपूर्वालाही भुरळ पडली आहे. राजने नुकताच त्याचा आणि तेजश्रीचा रिक्षात बसलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या त्याच्या फोटोवर कमेंट करत अपूर्वाने लिहिलं, "ऑसम शॉट… तुम्ही दोघं…" असं म्हणत तिने रेड हार्ट इमोजी पोस्ट केला. तर तिच्या कमेंटला तेजश्रीने ही रेड हार्ट इमोजी देत उत्तर दिलं.