Barkha Bisht Indraneil Sengupta Divorce: बरखा बिष्ट ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने आजवर ‘डोली सजा के रखना’, ‘कामिनी’ यासह अनेक मालिकांमध्ये व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आपल्या अभिनयाने टीव्ही ते सिनेमे व वेब सीरिज असा प्रवास करणारी बरखा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कारण बरखा व तिचा पती इंद्रनील विभक्त झाले आहेत.
एक काळ असा होता जेव्हा बरखा व इंद्रनील सेनगुप्ता एकमेकांच्या प्रेमात होते. दोघेही टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. ते २००६ मध्ये ‘प्यार के दो नाम…एक राधा एक श्याम’ या मालिकेच्या सेटवर भेटले होते. एकत्र काम करत असताना बरखा आणि इंद्रनील एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काही काळ डेट केल्यावर दोघांनी २००८ मध्ये लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी आहे.
जान्हवी कपूर-राजकुमार राव यांचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
१३ वर्षांचा संसार मोडला
बरखा बिष्ट व इंद्रनील सेनगुप्ता लग्नानंतर १३ वर्षांनी विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाबद्दल कळताच चाहत्यांना धक्का बसला होता. १३ वर्षांच्या संसारानंतर बरखा व इंद्रनील यांनी २०२३ मध्ये घटस्फोट घेतला. पण ते २०२० मध्येच वेगळे झाले होते. घटस्फोटानंतर बरखा आपली मुलगी मीराला एकल आई म्हणून सांभाळत आहे. नुकतंच बरखा ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलली.
रेखा यांनी धावत जाऊन जया बच्चन यांना मारली होती मिठी, दोघींनी एकत्र उभे राहून अमिताभ बच्चन यांना…
मोडलेल्या लग्नाबद्दल बरखा भावुक होत म्हणाली, “मला वाटतं कदाचित मी चांगली पत्नी असते तर.. कारण याशिवाय वेगळं होण्यामागे इतर कोणतेही कारण नाही. पण कदाचित जर मी चांगली पत्नी असते तर… खरं तर माझं लग्न मोडल्यावर मी विचार करतेय की मी एक चांगली पत्नी नव्हते का? आणि हा प्रश्न कायम माझ्या मनात राहील.” बरखाला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात स्थिरावले आहे, माझे कुटुंबीयही मला दुसरं लग्न करण्यास सांगत नाहियेत. पण जर मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर ते मला नक्कीच साथ देतील.”
सोनाक्षी सिन्हाची पती झहीरसह फिलिपिन्स सफर, हनिमूनचे रोमँटिक Photos केले शेअर
बरखा आणि इंद्रनील यांचा घटस्फोट का झाला?
बरखा बिष्ट किंवा इंद्रनील सेनगुप्ता यांनी कधीही त्यांच्या घटस्फोटामागचे कारण उघड केले नाही. याचे कारण सांगण्यासही त्यांनी नकार दिला होता. पण २०२१ मध्ये अनेक इंद्रनीलबद्दल काही बातम्या आल्या होत्या, त्यानुसार, इंद्रनीलचे बंगाली अभिनेत्रीसह विवाहबाह्य संबंध होते, ज्यामुळे त्याच्या व बरखाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र इंद्रनील किंवा इतर कोणीही याबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती.
© IE Online Media Services (P) Ltd