अभिनेत्री चाहत खन्ना (Chahat Khanna) हिला ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. तिने यामध्ये आयशा नावाची भूमिका केली होती. चाहत खूपच ग्लॅमरस आहे आणि सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. चाहतच्या करिअरबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा होते. अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. तिने दोन लग्नं केली, पण दोन्ही वेळा तिचे घटस्फोट झाले.

वर्षभरात मोडलं पहिलं लग्न

Chahat Khanna Divorce: चाहत खन्नाने २००६ मध्ये भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं. त्यावेळी ती फक्त २० वर्षांची होती. डेट केल्यावर दोघे लग्नबंधनात अडकले होते मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. वर्षभराने २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. चाहतने भरतवर शारीरिक व मानसिक शोषणाचे आरोप केले होते. पहिलं लग्न मोडल्यावर सहा वर्षांनी चाहतने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

दुसऱ्या लग्नातही आले वाईट अनुभव

पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर चाहतने २०१३ मध्ये फरहान मिर्झाशी लग्न केलं. पण दुसऱ्या लग्नात चाहतला खूप वाईट अनुभव आले आणि पाच वर्षांच्या संसारानंतर दुसऱ्यांदा तिचा घटस्फोट झाला. तिने २०१८ मध्ये दुसरा पती फरहान मिर्झापासून घटस्फोट घेतला होता. फरहानपासून विभक्त झाल्यावर चाहतने धक्कादायक खुलासे केले होते. फरहान शारीरिक आणि मानसिक शोषण करायचा असं ती म्हणाली होती. तो चाहतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घ्यायचा आणि तिला त्रास द्यायचा. फरहानला सोडण्याचा निर्णय योग्य होता, असं चाहतने घटस्फोटानंतर म्हटलं होतं. चाहतला फरहानपासून दोन जुळ्या मुली आहेत. आता ती एकटीच मुलींचा सांभाळ करत आहे.

अभिनेत्री चाहत खन्ना (फोटो- इन्स्टाग्राम)

हेही वाचा – राजेश खन्नाऐवजी अमिताभ बच्चन यांना पसंती का दिली? जावेद अख्तर यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “खुशामत करणारे…”

चाहतच्या तिसऱ्या लग्नाच्या होत्या चर्चा

मध्यंतरी चाहत अभिनेता रोहन गंडोत्राशी तिसरं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं, पण चाहतने या सर्व चर्चा फेटाळल्या होत्या. चाहत मागली नऊ वर्षांपासून टीव्हीपासून दूर आहे. ती अखेरची २०१५ मध्ये एका शोमध्ये दिसली होती. नंतर तिने २०२३ मध्ये ‘Yaatris’ चित्रपटात काम केलं होतं. सध्या ती अभिनयात फारशी सक्रिय नाही. ३७ वर्षीय चाहतचा कपड्यांचा एक ब्रँड आहे, त्यासाठी ती काम करते.