‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. सुदीप्तो सेन यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. धर्मांतराद्वारे काही महिलांना मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले, त्यांची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या चित्रपटावरून वाद सुरू आहे. हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या नवऱ्याबरोबर हा चित्रपट पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

देवोलिना भट्टाचार्जी गेल्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. धर्माने मुस्लिम असलेल्या शाहनवाजशी विवाहबद्ध झाल्याने देवोलिनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण देवोलिनाने अनेकदा सोशल मीडियावर शाहनवाजबद्दलचं प्रेम व्यक्त करत ट्रोलर्सना गप्प केलं आहे. नुकताच या दोघांनी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर शाहनवाजची प्रतिक्रिया काय होती हे देवोलिनाने सांगितलं आहे.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं
raveena tandon breakup with akshay kumar
अक्षय कुमारशी ब्रेकअप झाल्यावर केलेला आत्महत्येचा प्रयत्न? रवीना टंडन पहिल्यांदाच उत्तर देत म्हणाली, “खूप सारी…”

आणखी वाचा : “हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या…,” ‘द केरळ स्टोरी’ला प्रोपगंडा चित्रपट म्हणणाऱ्यांना अदा शर्माचे सडेतोड उत्तर

एका मुलीने तिच्या मैत्रिणीला ‘द केरला स्टोरी’वरून आलेल्या तिच्या बॉयफ्रेंडचा वाईट अनुभव ट्विटरवर शेअर केला. ते ट्वीट शेअर करत देवोलिनाने लिहिलं, “नेहमीच असं नसतं. माझा नवरा मुस्लिम आहे. तो माझ्याबरोबर हा चित्रपट पाहायला आला होता आणि त्याला हा चित्रपट आवडला. तो हा चित्रपट पाहून नाराज झाला नाही किंवा हा चित्रपट धर्माच्या विरुद्ध आहे असं त्याला वाटलं नाही. प्रत्येक भारतीयाने असं असलं पाहिजे असं मला वाटतं.”

हेही वाचा : “ज्यांना हा चित्रपट प्रोपगंडा वाटतो ते…,” ‘द केरला स्टोरी’च्या वादावर अनुपम खेर यांनी मांडले परखड मत

देवोलिनाचं हे ट्वीट आता खूप चर्चेत आलं आहे. या ट्वीटवर कमेंट्स करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी देवोलिनाच्या या ट्वीटचं कौतुक केलं, तर काहींनी यावरून तिला ट्रोलही केलं. तिचं हे ट्वीट आता खूप व्हायरल होत आहे.