टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दिशाने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर दिशा आणि राहुलवर शुभेच्छांचा सुरु आहे.
हेही वाचा : प्रोपगंडा चित्रपटच का? ‘द व्हॅक्सिन वॉर’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खोडून काढले आरोप
राहुल वैद्यने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. “आम्ही एका गोड मुलीला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असून, यासाठी मी आमच्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो.” असं गायकाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, पहिला फोटो आला समोर
लग्नानंतर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुलने यापूर्वीच त्याला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. राहुल आणि दिशाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बेबी बंप आणि सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना बाळ होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. यानंतर अभिनेत्याच्या घरी थाटामाटात दिशाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. सणासुदीच्या दिवसांत घरी बाळाचं आगमन झाल्याने सध्या वैद्य कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा : विकी कौशल आणि कतरिना कैफची ऑनस्क्रीन जोडी केव्हा जमणार?, अभिनेत्याने केला खुलासा; म्हणाला, “आम्ही दोघंही…”
दरम्यान, जवळचे कुटुंबीय, टेलिव्हिजन विश्वातील मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांनी दिशा आणि राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दिशाला ‘बिग बॉस १४’च्या घरात प्रपोज केल्यावर राहुल आणि दिशाने १६ जुलै २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.