scorecardresearch

Premium

‘ठिपक्यांची रांगोळी’तील अप्पूने सांभाळलं सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलचं कॅश काउंटर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वीच ठाण्यात स्वतःच नवीन हॉटेल सुरू केलं.

Dnyanada supriya

अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तर त्यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. तिथे यश मिळवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याने ठाण्यात स्वतःच नवीन हॉटेल सुरू केलं. सुप्रिया पठारेंचे मनोरंजनसृष्टीतील मित्र मंडळीही अनेकदा या हॉटेलमध्ये भेट देत असतात. तर ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ज्ञानदा रामतीर्थिकर हिने हॉटेलमधील महत्वाची जबाबदारी सांभाळली.

सुप्रिया पाठारे गेले अनेक महिने आपल्याला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून भेटायला येत आहेत. या मालिकेतील सर्व कलाकारांचं ऑफ स्क्रीन बॉण्डिंगही नेहमीच चर्चेत असतं. ते आता एकमेकांच्या कुटुंबाचाच भाग झाले आहेत. त्याच हक्काने या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थिकर हिने सुप्रिया पाठारे यांच्या मुलाच्या ‘महाराज’ हॉटेलच्या कॅश काऊंटरची जबाबदारी सांभाळली असं सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं आहे.

farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
woman committed suicide with her two-month-old baby connection with Postpartum depression
‘तिनं असं का केलं…?’
Tejswi Yadav Home
Bihar Floor Test : आमदार बेपत्ता झाल्याची तक्रार, पोलिसांची मध्यरात्री तेजस्वी यादवांच्या घरी धाड, बिहारमध्ये नक्की काय चाललंय?

आणखी वाचा : ‘असं’ आहे सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ठाण्यात सुरू केलेलं नवीन हॉटेल, पाहा खास झलक

या हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ज्ञानदा म्हणाली, “महाराज हॉटेल हा आमचा एक अड्डा झालेला आहे. आम्हाला तिथले सगळे पदार्थ खूप आवडतात आणि आम्ही अनेकदा त्या हॉटेलमध्ये येतो. बऱ्याच वेळा सुप्रियाताईही आम्हाला तिथे भेटते.” तर पुढे सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं, ” मालिकेतील आमच्या सर्व कलाकारांचं बॉण्डिंग इतकं छान झालं आहे की एकदा ज्ञानदा हॉटेलमध्ये आली होती आणि तेव्हा खूप गर्दी होती. तिने मला धावपळ करताना पाहिलं आणि मला म्हणाली, ताई तू किती काम करतेस! दमली असशील. असं म्हणत त्यादिवशी तिने हॉटेलचं कॅश काउंटर सांभाळलं.”

हेही वाचा : “फूड सेंटर सुरू करायचं ठरवलं तेव्हा…”, लेकाच्या हॉटेलबद्दल सुप्रिया पाठारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पाव भाजीबरोबरच इथे…”

तर आता सुप्रिया पाठारे यांचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. याचबरोबर त्यांचे चाहते त्यांच्या आणि ज्ञानदाच्या केमिस्ट्रीचही कौतुक करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress dnyanada ramtirthikar handled cash counter of supriya pathare son new hotel rnv

First published on: 13-09-2023 at 10:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×