‘मधुबाला’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. अभिनेत्रीने लग्नानंतर नऊ वर्षांनी गुड न्यूज दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर करत दृष्टीने ती लवकर आई होणार असल्याची बातमी दिली आहे. तिने शेअर केलेला व्हिडीओ खूप चर्चेत असून टीव्ही कलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दृष्टी धामी ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘मधुबाला’ या शोद्वारे तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. इतर अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने मनं जिंकणारी दृष्टी ‘मधुबाला’ मालिकेसाठी विशेष ओळखली जाते. दृष्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दृष्टी आता स्क्रीनपासून दूर असली तरी पती नीरजबरोबर सुखी वैवाहिक जीवन जगतेय. आता लग्नानंतर ९ वर्षांनी अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. दृष्टी धामीने एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर, काही दिवसांपूर्वीच घेतली मर्सिडीज, फोटो केले शेअर

दृष्टी धामी लग्नाच्या नऊ वर्षानंतर गरोदर आहे. ती व तिचा पती आयुष्यात नवीन सदस्याचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. दृष्टीच्या पतीचं नाव नीरज खेमका आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. दृष्टीने व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती व तिचा पती पांढरे टी-शर्ट आणि जीन्स घालून दिसत आहेत. दृष्टीच्या टी-शर्टवर ‘आई होण्याची तयारी सुरू आहे’, तर नीरजच्या टी-शर्टवर लिहिले आहे, ‘बाबा होण्याची तयारी सुरू आहे’ असं लिहिलं आहे. त्यानंतर या जोडप्याने हातात एक फलक धरला आहे, ज्यावर ते दोघे ऑक्टोबरमध्ये आपल्या बाळाचे स्वागत करणार असल्याचं लिहिलं आहे.

ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या

व्हिडीओमध्ये दृष्टी धामी आणि तिचा पती नीरज यांच्या हातात वाईनचे ग्लास दिसत आहेत, मात्र त्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या हातातून वाइनचे ग्लास घेतात आणि त्यांना दुधाची बाटली देतात. त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरनुसार दोघेही ऑक्टोबरमध्ये आई-बाबा होतील. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दृष्टी धामीने लिहिलं, “लवकरच एक लहान बाळ आमच्या आयुष्यात येणार आहे. प्लीज आम्हाला प्रेम, आशीर्वाद, कॅश आणि फ्रेंच फ्राईज पाठवा. बाळ वाटेत आहे. ऑक्टोबरची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

तीन लग्नं, दोन घटस्फोट अन् तिसरी पत्नी रशियन; फिल्मी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य

दृष्टीच्या या करण वाही, विक्रांत मॅस्सी, वाहबीज दोराबजी, अंकिता लोखंडे, मौनी रॉय, कुब्रा सैत, सनाया इराणी, करण टॅकर यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट्स करून या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. दृष्टी व नीरजबद्दल बोलायचं झाल्यास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं. दृष्टी व नीरज २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता लग्नाच्या नऊ वर्षांनी हे दोघे आई-बाबा होणार आहेत.