‘मधुबाला’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेत्री दृष्टी धामी लोकप्रिय झाली. दृष्टी धामी मागील अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. दृष्टी वर्षभरापूर्वी आई झाली. लग्नानंतर नऊ वर्षांनी तिने तिच्या पहिल्या लेकीचं स्वागत केलं. आता दृष्टीने लेकीचा चेहरा दाखवला आहे. इन्स्टाग्रामवर मुलीचे क्युट फोटो दृष्टीने पोस्ट केले आहेत.
दृष्टी धामी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी आई झाली. तिने मुलीचं नाव लीला ठेवलं आहे. दृष्टीने नवीन वर्षानिमित्त लेकीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आणि तिचा चेहरा दाखवला. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
‘Hello World! Meet : Ms. Leela Khemka’ असं कॅप्शन दृष्टीने या फोटोंना दिलं आहे. एका फोटो लीला केकजवळ उभी आहे. दुसऱ्या फोटोत दृष्टी व तिचा पती नीरज लीलाला घेऊन बसले आहेत, तर तिसऱ्या फोटोत दृष्टी व लीलाचा क्युट अंदाज पाहायला मिळतोय.
पाहा पोस्ट-
दृष्टी धामीने शेअर केलेल्या या फोटोंवर जेनिफर विंगेट, श्रिती झा, आश्का गोराडिया, मानिनी डे, शब्बीर अहलूवालिया, निक्की वालिया, कृतिका कामरा, सिद्धांत कर्णिक, सुनैना फोजदार, अदिती शर्मा, अदिती गुप्ता, युविका चौधरी, मुक्ती मोहन, अर्जित तनेजा, नुपूर सरवैया या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, दृष्टी व नीरज खेमका यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. दोघांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी नीरज व दृष्टीच्या हजेरी लावली होती. लग्नाच्या नऊ वर्षांनी २०२४ मध्ये हे दोघे आई-बाबा झाले. सध्या दृष्टी तिच्या लेकीबरोबर वेळ घालवतोय. त्याचबरोबर जाहिराती करतेय. पण मालिकाविश्वात अद्याप तिने कमबॅक केलेलं नाही.
