आज गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण आपल्या कुटुंबीयांबरोबर गुढी उभारत, त्याचबरोबर शोभायात्रेत सहभागी होत गुढीपाडवा साजरा करत आहेत. अनेक मराठी कलाकार आज कामातून थोडा ब्रेक घेऊन कुटुंबीयांबरोबर गुढीपाडव्याचा आनंद घेत आहेत. आज अनेक कलाकारांनी गुढीबरोबरचा त्यांचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तर आता अशात अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत चाहत्यांना एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तर नंतर ‘माझा होशील ना’ या मालिकेने तिला वेगळी ओळख दिली. आज तिचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आज तिने तिचा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या.
गौतमीने तिचा आणि गुढीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. आज गौतमीने गुढीपाडव्यानिमित्त पारंपारिक ड्रेस परिधान केला होता. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिलं, “गुढीपाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष अधिकाधिक हिरवंगार बनवूया.”असं लिहिताना तिने रोपट्यांचे इमोजीही दिले. गुढीपाडव्यानिमित्त ही पोस्ट लिहित तिने झाडे लावण्याचा संदेश तिच्या चाहत्यांना दिला.