Premium

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या लग्नात जावयाकडे मागितलेले तब्बल पाच लाख रुपये, नेमकं काय घडलं होतं?

अभिनेत्रीच्या आईने होणाऱ्या जावयाकडे मागितलेले पैसे

hansika motwani
अभिनेत्रीच्या आईने होणाऱ्या जावयाकडे मागितलेले पैसे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री हंसिका मोटवानीने ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खातुरियाबरोबर लग्नगाठ बांधली. जयपूरजवळील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेस येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हंसिका व सोहेच्या लग्नावर आधारित ‘लव्ह, शादी अँड ड्रामा’ ही वेब सीरिजही डिज्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात हंसिकाची आई नवऱ्यामुलाच्या कुटुंबियांकडे पाच लाख रुपये मागताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हंसिका मोटवानीच्या लग्नात सगळे विधी अगदी चोखपणे पार पाडल्या गेल्या. लेकीचं लग्न शुभ मुहुर्तावर पार पाडावं, असं हंसिकाच्या आईला वाटत होतं. म्हणून त्यांनी वरपक्षाला वेळेत येण्याची विनंती केली होती. वेळेत न आल्यास प्रत्येक मिनिटासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असंही त्यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा>> मनोज बाजपेयीला “नशेडी” म्हणणं पडलं महागात, बॉलिवूड अभिनेत्यावर अटकेची टांगती तलवार

हेही वाचा>> “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”

“माझी एक विनंती आहे. खातुरियाचे लोक नेहमी उशिरा येतात. मोटवानींना वेळेची फार किंमत आहे. त्यामुळे लग्नासाठी तुम्ही वेळेत या. जर तुम्ही उशीर केला, तर प्रत्येक मिनिटासाठी तुम्हाला पाच लाख रुपये मोजावे लागतील. ४:३० ते ६ ही वेळ अशुभ आहे. त्यामुळे थोडं लवकर येण्याची विनंती मी करत आहे”, असं हंसिकाची आई म्हणाली होती.

हेही वाचा>> “…तर कार्यक्रमात धुडगूस घालू” एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मनसेचा विरोध, नेमकं प्रकरण काय?

हंसिकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘शाका लाका बुम बुम’, ‘हम दो है ना’ या मालिकांत ती झळकली होती. याशिवाय तिने तेलुगु व तमिळ चित्रपटांत काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress hansika motwani mother demand 5 lakh rupees from groom sohail kathuriya family kak

First published on: 18-03-2023 at 16:40 IST
Next Story
Video: रश्मिका मंदानाला पाहून श्रेयस तळपदे फिदा; म्हणाला, “सिर्फ मेरेकु देखि नहीं…”