Premium

कविता मेढेकरांनी उघड केलं त्यांचं फिटनेस सिक्रेट, म्हणाल्या, “याचं उत्तर एकच आहे की…”

त्या नक्की काय करतात की त्यांचं आरोग्य इतकं निरोगी राहतं, हे गुपित त्यांनी उघड केलं आहे.

kavita lad

कविता लाड – मेढेकर या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या उत्तमोत्तम नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर मोठ्या कालावधीनंतर सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत दिसत आहेत. तर आता नुकतंच त्यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कविता मेढेकर यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या फिटनेसमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. फिटनेसच्या बाबतीत अनेक जणी त्यांना फॉलो करताना दिसतात. तर आता त्या नक्की काय करतात की त्यांचं आरोग्य इतकं निरोगी राहतं, हे गुपित त्यांनी उघड केलं आहे.

आणखी वाचा : “वेगळ्या आशयांच्या मालिकांना प्रेक्षक…,” कविता मेढेकरांनी मालिकांच्या कथानकाबद्दल मांडलं स्पष्ट मत

‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मनोरंजनसृष्टीत काम करत असताना शूटिंग, जेवण, व्यायाम कसलीच वेळ निश्चित नसते तरीही तुम्ही इतक्या फिट कशा, असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. पण मी म्हणेन की याचं उत्तर स्वयंशिस्त आहे. हे क्षेत्र ग्लॅमरस असलं, तरी इथे टिकून राहण्यासाठी शिस्त लागते. या क्षेत्रात काम करताना बारा तासांचीही शिफ्ट असते पण अनेकांना ते जमत नाही. या क्षेत्रात दुसरा पर्याय नाही.”

हेही वाचा : तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…

पुढे त्या म्हणाल्या, “शांत झोप घेतली की दुसऱ्या दिवशी काम करताना उत्साह असतो आणि रोज शांत झोप येण्यासाठी मनासारखं, प्रामाणिकपणे, निष्ठेने काम केलं पाहिजे. स्वतःची योग्य काळजी घेतली तर ताण जाणवत नाही. त्याचबरोबर रोज स्वत:शी साधलेला संवाद सकारात्मक ऊर्जा देऊन जातो.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress kavita lad medhekar shared her fitness secret saying descipline is important rnv