scorecardresearch

“…त्यामुळेच मिळाली एका राजाला राणी” मेघा घाडगेचा नववधूच्या लूकमधील फोटो व्हायरल, चाहते करताहेत अभिनंदन

मेघा घाडगेने नववधूच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. तसेच तिने दिलेलं कॅप्शनही विशेष लक्षवेधी आहे.

megha ghadge wedding look megha ghadge
मेघा घाडगेने नववधूच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. तसेच तिने दिलेलं कॅप्शनही विशेष लक्षवेधी आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये अभिनेत्री मेघा घाडगे सहभागी झाली. मात्र काही दिवसांमध्येच तिला घराबाहेर पडावं लागलं. अभिनयाबरोबरच तिने आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना आपलसं केलं. तिच्या नृत्यकौशल्याचे तर हजारो चाहते आहेत. सोशल मीडियावर तर ती फारच सक्रिय असते. आताही मेघाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – Video : अशोक सराफ यांनी ‘धुमधडाका’मध्ये परिधान केलेला शर्ट श्रेयस तळपदेनेही घातला अन्…; अभिनेत्याने शेअर केला ‘त्या’ सीनचा व्हिडीओ

मेघा विविध लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत असते. शिवाय एखाद्या विषयावर मत मांडणं असो वा तिच्या आयुष्याबाबत एखादी गोष्ट असो ती सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसते. आताही तिने नववधूच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहता नेटकरी तिचं अभिनंदन करत आहेत.

मेघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नववधूप्रमाणे सजलेली दिसत आहे. लाल रंगाचा लेहंगा तिने परिधान केला आहे. तसेच डोक्यावर लाल रंगाची ओढणी घेतली आहे. तिने या फोटोला दिलेलं कॅप्शन विशेष लक्षवेधी ठरत आहे.

आणखी वाचा – Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल

मेघाने हा फोटो शेअर करताना म्हटलं की, “एकमेकांमध्ये असलेला विश्वास हीच आमची कहाणी, कारण त्यामुळेच मिळाली एका राजाला राणी.” तुझं ताई ठरलं का?. अभिनंदन, हे कधी झालं? अभिनंदन अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी मेघाचा फोटो पाहता केल्या आहेत. त्यामुळे मेघा कोणाच्या प्रेमात पडली आहे का? तिने लग्न केलं आहे का? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 13:29 IST
ताज्या बातम्या