scorecardresearch

“बालिश विकृत लोकांसाठी…” मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

“बालिश विकृत लोकांसाठी…” मेघा घाडगेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मेघा घाडगेची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला ओळखले जाते. ती कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. ती सोशल मीडियावर कायमच विविध पोस्ट शेअर करत असते. आता ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

मेघा घाडगे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायम विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे हसतानाचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. याला तिने कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “ब्लाऊजचा गळा, कमरेखाली साडी अन् अंगविक्षेप…” मेघा घाडगेचा गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा हल्लाबोल

मेघा घाडगेची पोस्ट

“दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारी माणस ही माणुस्कीची लक्षण असतात.

ती खरी माणसं, पण दुसऱ्यांच्या दुःखात, त्यांच्या अपयशात आनंदी होणारी आणि दुसऱ्यांच्या आनंदावर जळणारी माणस ही अघोरी आणि विकृत असतात .जे नाही स्वतः च भलं करत नाही कोणाच होऊ देत.

अशा बालिश विकृत लोकांसाठी कायम हसत रहा जी भर के… मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केलंय म्हणून मी मी आहे ..!!” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

दरम्यान मेघा घाडगेची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. मेघा घाडगे लोकप्रिय लावणीसम्राज्ञी आहे. आपल्या ठसकेबाज लावणीने ती चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. ‘बिग बॉस’च्या घरातही तिला चाहत्यांनी पसंती दर्शविली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 20:06 IST

संबंधित बातम्या