मोहेना कुमारी (Mohena Kumari) ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व डान्सर आहे. तिला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये कार्तिकच्या बहिणीची भूमिका केल्यावर ओळख मिळाली. मोहेनाने डान्स रिअॅलिटी शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती मालिकाविश्वाकडे वळली. काही मालिकांमध्ये काम केल्यावर तिने लग्न केलं व या क्षेत्राला अलविदा केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहना आता दोन मुलांची आई आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनयक्षेत्र सोडलं असलं तरी ती तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते. तसेच अनेक कार्यक्रमांचे फोटो शेअर करत असते. मोहेना एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा आई झाली. तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने तिच्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत.

‘दामिनी’चे शूटिंग करताना दिग्दर्शकाने प्रपोज केलं अन्…, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला प्रसंग; म्हणाली, “हा सगळा वाद…”

मोहेनाच्या मुलाचं नाव अयांश आहे. दोन वर्षांचा अयांश आता मोठा भाऊ झाला आहे. तर मोहेनाने मुलीचं नाव गौरिता ठेवलं आहे. अयांश व गौरिता यांचे पहिले रक्षाबंधन असेल, त्यानिमित्ताने तिने त्या दोघांबरोबर फोटोशूट केलं आहे. हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

मोहेना कुमारीने शेअर केलेले फोटो –

मोहेना कुमारीने तिचा मुलगा अयांश व लाडक्या लेकीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो – मोहेना कुमारी इन्स्टाग्राम )

“अयांशचे त्याची लहान बहीण गौरिता हिच्याबरोबर हे पहिले रक्षाबंधन असेल. मला वाटत नाही की त्यांना आता ही संकल्पना समजत असेल, पण इतर कोणत्याही ‘संस्कारां’ प्रमाणेच आम्ही आई-वडील म्हणून त्यांना भावंडं म्हणून एकमेकांसाठी चांगल्या-वाईट काळात कायम जवळ राहण्याचे संस्कारसंस्कार देऊ इच्छितो,” असं कॅप्शन तिने फोटोंना दिले आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

मोहेनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिच्या पतीचं नाव सुयश रावत आहे. या दोघांनी पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये लग्न केलं. तिने २०२२ मध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, त्याचं नाव अयांश आहे. मोहेना ही मध्य प्रदेशमधील रीवाची राजकुमारी आहे. मोहेनाच्या सासरची मंडळी राजकारणात सक्रिय आहे. तिचे सासरे सतपाल महाराज उत्तराखंडचे पर्यटन मंत्री आहेत. तर तिचे पती सुयश हे फोटोग्राफर व बिझनेसमन आहेत.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

मोहेनाने ‘दिल दोस्ती डान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. पण पाच वर्षांपूर्वी लग्न केल्यावर तिने हे क्षेत्र सोडलं व ती संसारात रमली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mohena kumari shared her son ayansh and daughter gaurita photos hrc
Show comments