‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नविका कोटिया सध्या तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहे. नविकाने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तिचा होणारा पती तिला प्रपोज करताना दिसतोय. नविकाने माजेन मोदी याच्याशी साखरपुड्याची घोषणा केली आहे. नविका व माजेन यांच्या साखरपुड्याचा हा सोहळा खूप खासगी होता.

९ जानेवारी २०२६ रोजी, नविका कोटियाने रिअल इस्टेट डेव्हलपर माजेन मोदीबरोबरचा एक सुंदर एंगेजमेंट प्रपोजल व्हिडीओ शेअर केला. नविकाला साखरपुड्यात तिच्या होणाऱ्या पतीकडून एक कास सरप्राईज मिळाल्याने ती खूपच आनंदी झाली. नविकाने ‘आतापर्यंतचे सर्वात खास सरप्राईज’ असं म्हणत हा व्हिडीओ पोस्ट केला. माजेनने नविकाला ३० डिसेंबरला प्रपोज केलं.

व्हिडीओमध्ये नविकाने सुंदर गुलाबी ड्रेस घातला आहे आणि तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत आहे, तर तिचा होणारा नवरा माजेन काळ्या सूटमध्ये छान दिसत आहे. बर्फाळ ठिकाणी ‘Marry Me’ असं लिहून छान सेटअप माजेनने केला होता. तिथे त्याने नविकाला प्रपोज केलं. लाल गुलाब, शॅम्पेनचे ग्लास आणि “नविका, आय लव्ह यू” असं लिहिलेला एक सुंदर केक होता. माजेन नंतर गुडघ्यावर बसून नविकाला प्रपोज करतो.

पाहा व्हिडीओ

नविका कोटियाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर वाहबिज दोराबजी, प्रणाली राठोड, कृतिका देसाई, उल्का गुप्ता, निहारिका चौकसे, निधी उत्तम या कलाकारांनी कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत.

नविका कोटियाने केला साखरपुडा

नोव्हेंबर २०२५ मध्ये द मिररला दिलेल्या मुलाखतीत, नविकाने तिच्या साखरपुड्याबद्दल सांगितलं होतं. जानेवारी २०२६ मध्ये होईल, असं तिने म्हटलं होतं. त्यापूर्वी नविका व माजेनचं पारंपरिक जैन पद्धतीने लग्न ठरवण्यात आलं होतं. माजेनच्या पुण्यातील घरी अगदी साध्या पद्धतीने एक विधी झाला होता.

कुटुंबाने ठरवलं नविकाचं लग्न

नविकाने मुलाखतीत सांगितलं की तिचं व माजेनचं लग्न कुटुंबियांनी ठरवलं. म्हणजेच नविका अरेंज मॅरेज करत आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, यावर विश्वास असल्याचं नविकाने म्हटलं होतं. सुरुवातीला थोडी साशंक होते, पण थोडा वेळ घेऊन, विचार केल्यावर या लग्नासाठी होकार दिला, असं नविकाने नमूद केलं.

दरम्यान, नविका कोटिया अवघ्या २५ वर्षांची आहे. नविका व माजेन यांनी साखरपुडा केला आहे, पण ते दोघेही लग्न कधी करणार याबद्दल त्यांनी काहीच सांगितलेलं नाही.