scorecardresearch

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह

निलू कोहलींचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचे शुक्रवारी निधन झाले.

nilu kohli
(फोटो – इन्स्टाग्राम)

अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचं निधन झालं आहे. निलू कोहलींचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र शुक्रवारी दुपारी गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले. त्यावेळी घरात फक्त मदतनीस हजर होता. तो बाथरूममध्ये गेला असता हरमिंदर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, निलू कोहलींच्या फोनवर, त्यांची जिवलग मैत्रिण वंदना अरोरा यांनी ही दुःखद बातमी दिली. त्या म्हणाल्या, “शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. ते सकाळी गुरुद्वारात गेले आणि आले व बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले. त्यांच्या घरी फक्त एक मदतनीस होता. तो पण जेवणाची तयारी करत होता. पण बराच वेळ हरमिंदर आले नसल्याने ते झोपायला गेले असावे असं त्याला वाटतं. पण, ते तिथेही नव्हते, मग त्याने बाथरूममध्ये बघितले. त्यांनी बाथरूमचा दरवाजा लॉक केला नव्हता. त्या मदतीनसने आत पाहिले असता ते मृतावस्थेत पडला होते. हरमिंदर यांना मधुमेह होता, पण त्यांची प्रकृती ठणठणीत होती. ही दुर्दैवी घटना अचानक घडली.”

नीलू कोहली यांचा मुलगा इथे नसल्याने तो आल्यावर रविवारी हरमिंदर सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, नीलू कोहली या प्रसिद्ध टीव्ही व चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यानंतर आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये सहायक भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 07:43 IST

संबंधित बातम्या