‘कैसी ये यारियां’ फेम टीव्ही अभिनेत्री नीती टेलर पतीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आजवर अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी नीती गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. नीतीने सोशल मीडियावरून पती व सासरच्या लोकांचे फोटो हटवले होते. इतकंच नाही तर तिने तिचं इन्स्टाग्रामवरचं नाव बदललं होतं, त्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चा होत होत्या. या चर्चांवर आता नीतीने प्रतिक्रिया दिली आहे.

नीती टेलरच्या पतीचं नाव परीक्षित बावा आहे. दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यावर चार वर्षांपूर्वी २०२४ मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. परिक्षीत बावा हा लष्करी अधिकारी आहे. दोघांचा प्रेमविवाह होता. नीती पतीबरोबरचे व सासरच्या मंडळींबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. पण अचानक तिने ते सर्व फोटो हटवले व बावा हे आडनावही हटवलं. तिने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओदेखील डिलीट केले. नीतीच्या या कृतीनंतर तिच्या वैवाहिक जीवनात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सर्व चर्चांवर नीतीने मौन सोडलं आहे.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

नीतीने का हटवलं नाव?

‘टेलिचक्कर’च्या वृत्तानुसार, नीती टेलरच्या जवळच्या एका सूत्राने सांगितल की नीती आणि तिच्या पतीमध्ये सर्व काही ठीक आहे. नीतीने ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्याने इन्स्टाग्रामवर पतीचे आडनाव हटवले आहे. नीती सध्या चित्रपट आणि वेब-सीरिजमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिला तिच्या लग्नाची माहिती गुपित ठेवायची आहे. त्याच कारणाने तिने आडनाव व पतीबरोबरचे फोटो हटवले आहेत. नीतीने परिक्षीतला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चा होत्या, पण तसं नाही. अभिनेत्री पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अभिनयापासून दूर पण डोंगरात बांधलं सुंदर घर, ‘पैसे कुठून आले?’ विचारणाऱ्याला अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला…

नीती व तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होऊ लागल्यानंतर तिचे चाहते काळजी व्यक्त करत होते. पण दोघांच्या नात्यात काहीच अडचणी नसल्याचं नीतीच्या जवळच्या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे. नीतीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेत्रीने ‘कैसी हैं ये यारियां’, ‘इश्कबाज’, ‘गुलाम आणि बडे अच्छे लगते हैं २’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. याशिवाय ती झलक दिखला जा या रिॲलिटी शोचा भागही राहिली होती. ती या शोच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.