scorecardresearch

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलीला ओळखलंत का? आज आहे आघाडीची मराठी अभिनेत्री

जागतिक रंगभूमी दिनाचं अवचित्य साधून तिने तिचे बालपणीचे काही फोटो शेअर केले.

prajakta gaikwad childhood photos

आजचा दिवस हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दिनाचं अवचित्य साधून अनेक मराठी कलाकार त्यांच्या नाटकाच्या आठवणी, खास फोटो शेअर करत आहेत. अशातच एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अजिबात ओळखू येत नाहीये. एका फोटोमध्ये ती चाणक्यच्या वेशभूषेमध्ये दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती धरतीमातेच्या वेशभूषेत दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. या फोटोंमध्ये तिला अजिबात ओळखलं नसल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका सकारात प्रेक्षकांच्या मनात घर केलेली प्राजक्ता गायकवाड आहे.

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

प्राजक्ताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. शाळेत असताना तिने विविध एकांकिकांमध्ये भाग घेतला. याच दरम्यानचे फोटो तिने आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “आज जागतिक रंगभूमी दिन… याच निमित्ताने शाळेत असताना “चाणक्य की प्रतिज्ञा” हे हिंदी एकांकिका स्पर्धेत केलेलं नाटक.. त्यात केलेली चाणक्याची प्रमुख भूमिका… सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून प्रथम क्रमांक पटकावला…. त्याचेच काही फोटो.”

हेही वाचा : Video: …अन् माईकसमोर बोलता बोलता प्राजक्ता गायकवाडला कोसळले रडू, जाणून घ्या कारण

आता तिचे हे फोटो खूप चर्चेत आले असून तिचे चाहते तिचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या