प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमांतून प्राजक्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळाली. सध्या प्राजक्ता ‘तीन अडकून सीताराम’ या तिच्या नव्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने लग्न, प्रेम आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “सई ताम्हणकर माझी लेडी क्रश”, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, “तिचा बोल्डनेस…”

प्राजक्ता माळी खऱ्या आयुष्यात प्रेमात केव्हा पडणार आणि कधी बेडीत अडकणार? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर मीडिया टॉल्क मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “प्रेक्षकांना मी सांगेन वाट बघा…सध्या मी माझ्या आयुष्याच्या प्रेमात आहे. प्रत्येकाने स्वत:वर प्रेम करणं गरजेचं आहे. प्रत्येकवेळी कोणा दुसऱ्याच्या प्रेमात का पडायचं? तुम्ही स्वत:वर प्रेम करा.”

हेही वाचा : दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष

“कोणत्याही बेडीत अडकणं हे माझ्या मूळ स्वभावात नाही आहे. बेडीत किंवा बंधनात अडकणं हे माझ्या स्वभावाच्या विरोधात आहे. त्यामुळे सध्या मी प्रत्येक गोष्टीसाठी वेळ घेईन.” असं प्राजक्ताने सांगितलं.

हेही वाचा : “बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासूनच अमृता…”, अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “मी शिकवलं तशीच…”

दरम्यान, तीन अडकून सीताराम हा चित्रपट २९ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये वैभव तत्त्ववादी, प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे व हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader