Marathi Actress Supports Tanvi Kolte For Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या १९ एप्रिल रोजी शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. या शोच्या अंतिम फेरीत तन्वी कोलते, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि राकेश बापट पोहोचले आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता किंवा विजेती करण्यासाठी चाहते आणि कलाकार मंडळीसुद्धा पाठिंबा देत आहेत.

नुकतीच शोमधून रेवा कौरासे बाहेर पडली. त्यानंतर तन्वी, दीपाली, विशाल, अनुश्री आणि राकेश हे टॉप-५ स्पर्धक उरले आहेत. यांपैकी आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी अनेकजण सोशल मीडिया पोस्ट शेअर करत पाठिंबा देत आहे. दरम्यान, रेवा ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताना तन्वीने केलेल्या वक्तव्यामुळे तिला सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

तन्वी या शोमध्ये गेले काही दिवस चांगला खेळ खेळताना दिसली. त्यामुळे अनेकजण तन्वीच या शोची विजेती होऊ शकते, असं मत व्यक्त करत होते. मात्र, रेवा बाहेर पडताना तिने केलेल्या विधानामुळे अनेक प्रेक्षक तिच्यावर नाराज झाले आहेत.

रेवा बाहेर पडताना तन्वीने “खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि चांगल्या मनाची पोरगी बाहेर गेली”, असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावर नेटकरी आणि काही कलाकारांनी टीका केली आहे. मात्र, एका अभिनेत्रीने तन्वीला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता नवनाळे.

अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेने तन्वीला पाठिंबा देणारी पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. तसेच या पोस्टमधून तिने एका चुकीमुळे माणूस वाईट होत नसतो, असंही स्पष्टपणे म्हटलं आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता तन्वीबद्दल लिहिते, “बिग बॉसची खरी विजेती तूच आहेस. तुझा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला तर तू खूप बिनधास्त आणि खंबीर मुलगी असल्याचे जाणवले. माणसाकडून एखादी चूक झाली म्हणजे तो माणूस वाईट होत नसतो. सध्या जरी तुझ्याबद्दल नकारात्मक चर्चा सुरू असली, तरी मला तू कुठेही खोटी (फेक) वाटत नाहीस. ही ट्रॉफी तुलाच मिळायला हवी. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.”

Prajakta Navnale sharing a support post for Tanvi Kolte
प्राजक्ता नवनाळेने तन्वी कोलतेसाठी शेअर केली पोस्ट

दरम्यान, प्राजक्ता सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती ‘बिग बॉस’ मधील काही महत्त्वाच्या घडामोडींवसुद्धा तिचे मत व्यक्त करताना दिसलीय. अशातच आता प्राजक्ताने तन्वीच्या समर्थनार्थ खास पोस्ट शेअर केली आहे.