सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे. बाप्पाच्या आगमनाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. मराठीसह हिंदी आणि साऊथच्या अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक कलाकारांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही सोशल मीडियावर गणपती बाप्पाचा एक खास व्हिडिओ शेअर करत शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा- ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री गेली १० वर्ष मोदक बनवण्याचा करतेय प्रयत्न; म्हणाली……




प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमांतून प्राजक्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला एक वेगळी ओळख मिळाली. प्राजक्ताच्या घरीही गणरायाचे आगमन झालं आहे. प्राजक्ताने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये प्राजक्ताची भाची गणपती स्त्रोताचे पठण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने लिहिलं आहे. “भाचीचं गणपती स्तोत्र पठण, मानाच्या ५ गणपतींच दर्शन, भाऊ रंगारी – महाआरती, घरात पुरी-भाजी श्रीखंड बेत, ४ उकडीचे १ तळलेला मोदक फस्त. गणेश चतुर्शी उत्साहात साजरी झाली.”
दरम्यान, तीन अडकून सीताराम हा चित्रपट २९ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये वैभव तत्त्ववादी, प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे व हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.