अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यापूर्वी ती तिचं वैयक्तिक आयुष्य आणि आदिल खान दुर्रानीशी केलेल्या लग्नामुळे चर्चेत होती. आदिलशी लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव बदलून फातिमा असं ठेवलं. रमजानच्या महिन्यात आता तिने रोजा ठेवला आहे. पण आता तिच्याकडून तो रोजा मोडला गेल्याचं तिने सांगितलं. पण यामुळे आता ती ट्रोल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रमजानचा महिना सुरू झाला आहे. पण राखीचा पती आदिल खान गेले काही महिने तुरुंगात आहे. पती तुरुंगात असतानाही राखीने रमजानचे रोजे ठेवले आहेत. तिने ठेवलेल्या या रोज्यांबद्दल ती विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट्स देत होती. हा तिचा पहिला रोजा आहे आणि या काळात ती अनेक गोष्टी शिकत असल्याचं तिने याआधी सांगितलं आहे. तिच्या या सातत्याचं अनेकांनी कौतुक केलं. आता तिच्याकडून हा रोजा मोडला गेल्याचं तिने सांगितलं. पण हे सांगताना तिने सांगितलेलं कारण ऐकून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.

आणखी वाचा : राखी सावंत देणार अभिनयाचे धडे, दुबईत सुरु करणार अक्टिंग अकॅडमी, म्हणाली, “आता लवकरात लवकर…”

राखीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी विमानतळावर असल्याचं दिसत आहे. राखी उभी राहून चुइंग गम खात तिथे जमलेल्या पापराझींशी गप्पा मारत होती. या वेळी त्यांच्यात तिने ठेवलेल्या रोज्यांबद्दल बोलणं सुरू झालं. त्या वेळी ती म्हणाली की, “प्रवास करताना माझ्याकडून रोजा मोडला गेला.” त्यावर एकाने तिला विचारलं, “काय झालं? खाल्लंस का काही?” त्यावर राखी म्हणाली, “चुकून चुइंग गम खाल्लं.”

हेही वाचा : “ती काहीही बोलत आहे कारण…” राखी सावंतच्या वक्तव्यांवर अभिनेत्रीचा भाऊ राकेशची प्रतिक्रिया

तिच्या या बोलण्याने अनेक जण नाराज झाले. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांचा राग व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तू आधी रोजा ठेवला तरी होतास का, जो मोडला म्हणत आहेस! तू फक्त सर्व धर्मांची मस्करी करतेस.” तर दुसऱ्याने लिहिलं, “जर तुला कळलं की, तुझा रोजा चुकून मोडला तर त्या क्षणी तू ते चुइंग गम थुंकायला हवं होतंस.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “इस्लाम आणि रोजाची थट्टा करू नकोस.” तर एकाने लिहिलं, “तुझं तर लग्न मोडलं, मग रोजा मोडणारच होता.” अशा विविध कमेंट्स करत नेटकरी तिच्यावर निशाणा साधत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rakhi sawant mistakenly breaks her roza fasting and shared its reason rnv
Show comments