TV Actress Casting Couch Experience : बॉलीवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, या क्षेत्रात अभिनेत्रीं वेगवेगळ्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागत. इंडस्ट्रीतल्या झगमगटामागे घडणारी वाईट गोष्ट म्हणजे कास्टिंग काउच. स्वत:बद्दल घेडलेल्या कास्टिंग काउचबद्दल काही अभिनेत्री काही जणी गप्प राहणंच पसंत करतात. तर काही अभिनेत्री मात्र याबद्दल मोकळेपणाने बोलतात. दुर्दैवाने आजवर अशा अनेक अभिनेत्रींना याचा सामना करावा लागला आहे.

कास्टिंग काउचचा बळी ठरलेल्या काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, अभिनेत्री रश्मी देसाई. रश्मीने एका मुलाखतीत तिच्याबद्दल घडलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला होता. त्यावेळी रश्मी केवळ १६ वर्षांची होती. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिने हा प्रसंग सांगितला होता.

रश्मी देसाईने सांगितलं होतं की ती कास्टिंग काउचच्या अनुभवातून गेली आहे. अवघ्या १६ व्या वर्षी तिच्याबरोबर एक अत्यंत भयावह घटना घडली होती. मुलाखतीत रश्मी म्हणालेली, “दुर्दैवाने कास्टिंग काउचची घटना घडली आहे आणि याबद्दल मी याआधीही बोलले आहे. तो अनुभव खूपच भयावह होता.”

“त्याने मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला”

तिने पुढे सांगितलेलं की तिला एका ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं. “मी तिथे गेले, तेव्हा तिथे त्याच्याशिवाय कुणीही नव्हतं. त्यावेळी माझं वय फक्त १६ वर्षं होतं. त्याने मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी खूप घाबरले होते, अस्वस्थ वाटत होतं, पण कसंतरी तिथून बाहेर पडले. या घटनेनंतर काही तासांनी तिने सगळं आपल्या आईला सांगितलं. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्या व्यक्तीला भेटायला गेली, पण यावेळी तिच्या सोबत आई होती.”

“माझ्याबरोबर केलेल्या कृत्याबद्दल आईने…”

यापुढे रश्मी म्हणालेली, “माझ्याबरोबर केलेल्या कृत्याबद्दल आईने त्याला कानाखाली लागावली होती. कास्टिंग काउच ही खरी गोष्ट आहे, पण प्रत्येक इंडस्ट्रीत चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात.” शेवटी रश्मीने सांगितलं की पुढे तिला अनेक चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

“मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण नंतर मला उत्तम लोकांबरोबर काम करता आलं आणि तो अनुभव खूप चांगला होता. देव खूप दयाळू आहे,” असंही ती म्हणाली होती. रश्मी देसाई ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती ‘उतरन’ या मालिकेमधील तपस्या या भूमिकेमुळे. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.