Premium

‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”

रश्मिका मंदाना आणि मराठी गाणी यांचं कनेक्शन खूप जुनं आहे, असं तिने नुकतंच सांगितलं.

rashmika

आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर आता लवकरच तिचा मराठमोळा अंदाज समोर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये ती सहभागी होणार आहे. इतकंच नाही तर या कार्यक्रमामध्ये ती लावणी ही सादर करणार आहे. कार्यक्रमातील तिचे काही प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहेत. पण रश्मिका मंदाना आणि मराठी गाणी यांचं कनेक्शन खूप जुनं आहे, असं तिने नुकतंच सांगितलं.

आणखी वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचं आणि मराठी गाण्यांचं हे कनेक्शन उघड केलं. ती म्हणाली, “मी लहानपणी ‘ऐका दाजीबा’ या गाण्यावर नाच केला होता. तेव्हाच माझी मराठी गाण्यांशी ओळख झाली. त्यानंतर आता अनेक वर्षांनी लावणी सादर करत आहे. त्यामुळे या निमित्ताने माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या आहेत आणि आता ही लावणी करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण मी पहिल्यांदाच लावणी सादर करत आहे. मला आशा आहे की माझा हा नाच तुम्हा सर्वांना आवडेल.”

हेही वाचा : “मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

हा पुरस्कार सोहळा २६ मार्च रोजी रंगणार आहे. रश्मिका पहिल्यांदाच मराठी गाण्यावर थिरताना दिसणार असल्याने सर्वजण तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress rashmika mandanna shared her connection with marathi songs rnv

First published on: 18-03-2023 at 10:04 IST
Next Story
मुलगा शाळेत पास झाल्यावर त्याला उच्च न्यायालयात घेऊन गेला अश्नीर ग्रोव्हर; फोटो ट्वीट करत म्हणाला…