scorecardresearch

Video : “भेटले त्याला…” रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Video : “भेटले त्याला…” रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत
रुचिरा जाधव

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव ही बिग बॉस मराठीमुळे सातत्याने चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी एकत्र सहभागी झाली होती. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले, सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली. रुचिराने त्याला अनफॉलो केले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुचिरा याबद्दल विविध पोस्ट करताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून रुचिरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अप्रत्यक्षरित्या रोहितवर टीका केली आहे. रुचिराने तिच्या या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती कृष्णाच्या मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे. याचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “३ वर्षात समजलेला लाईफ पार्टनर विरुद्ध ६ आठवड्यातला नवा चेहरा…” रोहितला माफ करण्याबद्दल रुचिरा जाधवचे स्पष्ट विधान

“ही एकमेव जागा आहे जिथे मी शांततेत श्वास घेऊ शकते. माझा कृष्ण… माझी आवडती जागा….भेटले त्याला.. जो माझा आहे, सर्वार्थाने.. जो बदलत नाही वेळ आणि जागा बघून.. म्हणूनच मी त्याची आहे…. सर्वार्थाने…..माझा कृष्ण, हरे कृष्ण” असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे.

आणखी वाचा : “तू सत्य मानणार नाहीस आणि…” रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर रोहित आणि रुचिरा एकमेकांबरोबर छान मिळून मिसळून राहत होते. पण काही दिवसांनी टास्क खेळताना, घरात वावरताना त्यांच्या मतभेद झाले. त्यांचा हा वाद वाढतच गेला. रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यातील वाद आणखी चिघळला.

या कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. यानंतर तिने काहीही केलं तर मी त्याला फॉलो करणार नाही, असेही जाहिरपण सांगितले. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फूट पडल्याची बोललं जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुचिरा ही  रोहितच्या आणि तिच्या नात्यात सर्व काही बिनसल्याचे संकेत देताना दिसत आहे. तर दुसरीकडे रोहितने यावर मौन बाळगले आहे. 

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 20:13 IST

संबंधित बातम्या