कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे, कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री रुचिरा जाधव(Ruchira Jadhav)ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रुचिराने इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर फोटो शेअर करत ती एका दिवसात गणपतीसाठी तिच्या गावी जाऊन आल्याचं सांगितले आहे.

vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Bigg Boss 18 nia sharma not going in salman khan show
Bigg Boss 18 : ग्रँड प्रिमियरच्या काही तासांआधी लोकप्रिय अभिनेत्रीने सलमान खानच्या शोला दिला नकार, पोस्ट करत म्हणाली, “मला दोष…”
mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
meet south actress who rejected srk film once struggle for food
एकेकाळी जेवणासाठी पैसे नव्हते; स्टार झाल्यावर शाहरुखचा ब्लॉकबस्टर सिनेमा नाकारला, आज ‘ही’ अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
daljeet kaur
पहिल्या लग्नापासून मुलगा, अवघ्या ८ महिन्यात मोडलं दुसरं लग्न; अभिनेत्रीला विकावं लागलं राहतं घर, म्हणाली…
woman arrested from mp for stealing valuable watch from actress house
अभिनेत्रीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेला मध्यप्रदेशातून अटक
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”

“बाप्पा म्हणाला, पुढच्या वर्षी नाही, याच वर्षी ये…”

रुचिराने शेअर केलेल्या फोटोंबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले, “बाप्पा म्हणाला, पुढच्या वर्षी नाही, याच वर्षी ये. बाप्पांसाठी आणि माझ्या पप्पांसाठी,गेलेच. काय दिवस होता. सकाळी जाऊन संध्याकाळी परत मुंबईला परत आले. आपल्या कोकण रेल्वेची किमया. तसं मी चिपळूणची आहे पण सकाळची वंदे भारत चिपळूनला थांबत नाही त्यामुळे खेडला उतरले. आणि जे जे ठरवलं होतं, ते सगळं करुन आले. ते १८ तास थकवणारे होते मात्र तरीही सगळं छान झालं. माझं गाव अख्खं फिरून आले, सॉरी जगून आले. काकीच्या हातचं बेसन भाकरी खाण्यापासून ते सोमेश्वरच्या मंदिरात जाईपर्यंत. मी कोकण प्रवासासाठी जे ठरवलेलं ते जवळजवळ सगळं पूर्ण केलं. खूप वर्षांनी गणपतीला गावी गेले होते.
लहानपणी दरवर्षी जायचे. माझं खूप मोठं कुटुंब आहे. आम्ही खूप मजा करायचो.”

इन्स्टाग्राम

“माझ्या लक्षात आहे की मुंबईत माझी शाळेत १०० टक्के हजेरी असायची. फक्त गणपतीच्या सुट्टीत एक खाडा व्हायचा. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघत असू. नंतर शूटमुळे जाणं कमी झालं. पण मी कमीत कमी गणपतीला २-३ दिवस गावी जाऊ, असं मी ठरवलं होतं. कोव्हिडनंतर तर ब्रेक लागला. गेल्या ५-६ वर्षात गणपतीसाठी जाऊच शकले नाही. पण या वर्षी या दिवसासाठी सुट्टी घेतली. मी ठरवले होते, मला जायचे आहे. मला माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचे हसू पहायचे होते. पप्पांची नेहमी इच्छा असते, मी त्यांच्यासोबत जाऊ. आधी ते आग्रह करायचे, आता फक्त विचारतात, एक दिवसासाठी तरी जमेल का यायला? मग काय, अचानक प्लॅन बनवला आणि दोघांना सरप्राइज दिलं.” अशी पोस्ट लिहित अभिनेत्रीने एक दिवसाचा कोकण प्रवास सांगितला आहे.

हेही वाचा: “याला म्हणतात माणुसकी”, मलायका अरोराच्या वडिलांचे निधन झाल्यावर नेटकरी अरबाज खानचं करतायत कौतुक

तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी अप्रतिम, छान, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.

दरम्यान, रुचिराच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने ‘सोबत’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तर ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केले होते. ती बिग बॉस मराठीच्या ४ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.