‘अनुपमा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी रुपाली गांगुली ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या रुपालीने आता राजकारणातही प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मालिकेत अनुपमाची प्रेम कहाणी यशस्वी झाली नसली तरी वैयक्तिक आयुष्यात रुपालीची प्रेम कहाणी मात्र खूप रंजक आहे.

रुपाली गांगुलीने ११ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये अश्विन के वर्माशी लग्न केलं होतं. एका मुलाखतीत रुपालीने तिची लव्ह स्टोरी सांगितली. रुपाली व अश्विन लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. आपल्याला कधीच थाटामाटात लग्न करायचं नव्हतं, कारण ही पैशांची बरबादी आहे, असं रुपालाली वाटायचं. तिने व अश्विनने अगदी साधेपणाने कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यावेळी रुपाली ‘परवरिश’ या मालिकेत काम करत होती.

गोविंदाच्या भाचीने सोडला हिंदू धर्म? अभिनेत्री रागिनी खन्ना धर्मांतराच्या ‘त्या’ पोस्टबद्दल म्हणाली, “मी माझा धर्म…”

लग्नाच्या सुट्टीचा किस्सा

रुपालीने सांगितलं की तिचं व अश्विनचं लग्न फक्त १५ मिनिटांत झालं होतं. रुपाली म्हणाली, “मी लग्नासाठी मालिकेच्या निर्मात्याला एका दिवसाची सुट्टी मागितली, तर त्याने सुट्टी दिली, पण ‘तू खरंच लग्न करणार आहेस का’, असं विचारलं. कारण मी त्याआधीही एकदा लग्न करण्यासाठी सुट्टी घेतली होती पण लग्न केलं नव्हतं. त्यामुळे मी यावेळी सुट्टी घेऊनही खरंच लग्न करेन, असं निर्मात्याला वाटत नव्हतं.”

गौहर खानच्या एक्स बॉयफ्रेंडशी लग्न करतेय ‘ही’ अभिनेत्री? १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह साखरपुड्याच्या चर्चांवर म्हणाली…

१५ मिनिटांत केलं लग्न

रुपाली म्हणाली, “मी १२ वर्षे अश्विनची वाट पाहिली होती. माझ्या वडिलांनी मला १५ मिनिटांपूर्वी सांगितलं होतं की त्यांना कन्यादान करायचं आहे. आमच्याकडे भटजी नव्हते. कसं तरी आम्ही एका भटजीला पकडून आणलं, पण ते तर माझ्याही पेक्षा जास्त व्यग्र होते. अश्विनने आपली गाडी पार्कही केली नव्हती आणि भटजीने मंत्र म्हणणं सुरू केलं होतं. अशा रितीने माझं लग्न १५ मिनिटांत आणि मेहंदी चार तासांत झाली होती.”

धर्मेंद्र यांच्यासोबत ४४ वर्षांचा संसार, पण कधीच सासरी गेल्या नाहीत हेमा मालिनी; जाणून घ्या कारण

आपल्या अभिनयाची मनं जिंकणाऱ्या रुपाली गांगुलीने तिच्या करिअरची सुरुवात २४ वर्षांपूर्वी २००० साली ‘सुकन्या’ या मालिकेतून केली होती. तिने ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘अदालत’, ‘कहानी घर घर की’, ‘संजीवनी’, ‘भाभी’, ‘कसौटी जिंदगी की’ अशा मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. आजवर अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. ती टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ मध्येही झळकली होती. ४७ वर्षीय रुपालीने ३६ व्या वर्षी अश्विन के वर्माशी लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगा आहे.