मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आतापर्यंत तिने साकारलेल्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तर आता तिने केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

ऋतुजा बागवे चाहतावर्ग मोठा आहे. तर ऋतुजाही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःच नवीन घर घेतलं. तर या घरासाठी आता तिने खास नेमप्लेट बनवून घेतली आहे.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण

आणखी वाचा : “जेव्हा लोक विचारतात, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा…” ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत

काही दिवसांपूर्वी ऋतुजाने मुंबईत तिचा स्वतःच पहिलं घर घेतलं असल्याची बातमी चाहत्यांची शेअर केली. त्यानंतर हे ऋतुजा तिच्या या नवीन घराबद्दलचे अपडेट्स सोशल मीडियावरून देत असते. सध्या या घराच्या इंटिरियरचे काम सुरू आहे. या तिच्या नवीन घरासाठी तिने एक खास नेमप्लेट तयार करून घेतली आहे. काळ्या रंगाच्या या नेमप्लेटवर पांढऱ्या रंगाच्या फुलांची सुंदर नक्षी आहे. तर यावर तिने फक्त ऋतुजा बागवे असं नाही तर ‘ऋतुजा प्रतिभा राजन बागवे’ असं पूर्ण नाव लिहिलं आहे. आता तिच्या नवीन घराची ही आकर्षक नेमप्लेट आणि त्यावर तिने लिहिलेलं पूर्ण नाव सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : Video: ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

आता सोशल मीडिया वरून या नेमप्लेट बाबत प्रतिक्रिया देत असे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी ही नेमप्लेट आवडल्याचं सांगत आहेत.

Story img Loader