scorecardresearch

“होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात…” सायली संजीवने सांगितली आदेश बांदेकरांबद्दल ‘ती’ आठवण

यावेळी तिने तिला मिळालेल्या पहिल्या पैठणीबद्दलची गोष्ट सांगितली आहे.

“होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात…” सायली संजीवने सांगितली आदेश बांदेकरांबद्दल ‘ती’ आठवण
सायली संजीव आदेश बांदेकर

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सध्या ती तिच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सायली संजीवने तिला मिळालेल्या पहिल्या पैठणीबद्दलचा किस्सा सांगितला आहे.

महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणून ‘होम मिनिस्टर’ला ओळखले जाते. गेल्या १८ वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे ‘भावोजी’ म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच सायली संजीव होम मिनिस्टरमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिला मिळालेल्या पहिल्या पैठणीबद्दलची गोष्ट सांगितली आहे.
आणखी वाचा : “आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम

“गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाच्या निमित्ताने मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. मी आतापर्यंत एकही पैठणी विकत घेतलेली नाही. कोणतीही नाही. पण तुमचे खूप खूप आभार कारण मला पहिली पैठणी ही होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात मिळाली होती. मी कधीच संगीत खुर्ची वैगरे कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. त्यात जिंकणार नाही हे मला माहितीच होते.

आपण डोंबिवलीत मकर संक्रांतीच्या निमित्ताने झी मराठीच्या कलाकारांचं महामिनिस्टर घेतलं होतं. तिकडे शेवटी संगीत खुर्ची हा खेळ होता. त्यावेळी मी मनाशी ठरवलं होतं की आता मी हरणारच आहे. पण मी तो खेळ खेळले, तो जिंकले आणि पहिली पैठणी तुम्ही मला दिली होती”, असा किस्सा सायली संजीवने सांगितला.

आणखी वाचा : “मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 19:00 IST

संबंधित बातम्या