छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. प्रेक्षकांची लाडकी शिल्पा शिंदे सध्या 'खतरों के खिलाडी १४' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. शोमध्ये स्टंट करण्यासोबतच शिल्पा खूप मस्ती करतानाही दिसत आहे. शिल्पा तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असते. आता शिल्पा तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. शिल्पाचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत. 'बिग बॉस ११' ची विजेती शिल्पाच्या लग्नाच्या चर्चांनी तिचे चाहतेही उत्साहित झाले आहेत. सध्या ही अभिनेत्री 'खतरों के खिलाडी' शोमध्ये विविध स्टंट करत हा शो जिंकण्याच्या उद्देशाने पुढे जात आहे. याच शोमध्ये घडलेल्या एका प्रसंगाने शिल्पाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. हेही वाचा.“जर तू डीपीदादाबरोबर राजकारण…”, आधीच्या पर्वातील स्पर्धकाने अंकिताच्या खेळावर व्यक्त केली नाराजी सध्या शिल्पाचे नाव अभिनेता करणवीर मेहरा याच्याशी जोडले जात आहे. करणवीर 'खतरों के खिलाडी १४' मध्ये शिल्पासह दिसत आहे. एका स्टंट दरम्यान करणवीर शिल्पाला म्हणाला की, "जर आपण हा स्टंट जिंकलो तर आपण लग्न करू," यावर शिल्पाने उत्तर दिलं की, "नाही, गडबड होईल. को-ऑर्डिनेशन नीट होणार नाही." तर करण म्हणाला, "काही अडचण येणार नाही, आपण करू." करण आणि शिल्पा जुने मित्र आहेत आणि एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. https://www.instagram.com/reel/C_TR8jJCr-5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा.Quiz : छोट्या पडद्यावर वादग्रस्त ठरणाऱ्या Bigg Boss Marathi शोबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न करणवीरची तिसरी पत्नी होणार शिल्पा? अभिनेता करणवीर मेहराची याआधी दोन लग्नं झाली आहेत. तर, ४७ वर्षीय शिल्पाचे २००९ मध्ये लग्न जमले होते. ती अभिनेता रोमित राजशी लग्न करणार होती. तिचा साखरपुडा झाला होता आणि लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या, पण शेवटच्या क्षणी हे नाते तुटले. त्यानंतर शिल्पाने लग्नाचा विचार केला नाही. पण आता शोमधील तिचा आणि करणवीरचा संवाद पाहून ते लग्न करतील का, अशा चर्चा रंगल्या आहेत.