अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. विराजसची आई मृणाल कुलकर्णी यांची शिवानी ही अत्यंत लाडकी आहे. त्या दोघींमध्ये सासू-सूनेपेक्षा मैत्रिणींचे नाते आहे. विशेष म्हणजे शिवानी ही तिच्या सासूबाईंना सासू किंवा आई या नावाने नव्हे तर ‘ताई’ या नावाने हाक मारते. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला आहे.

शिवानी रांगोळे ही लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रसारित होणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत शिवानी ही अक्षरा ही भूमिका साकारताना दिसत आहे. लग्नानंतर शिवानीची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या निमित्ताने शिवानीने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवानीला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि सासूबाईंबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
आणखी वाचा : “…त्यादिवशीही मला शूटींगला आल्यासारखं वाटत होतं”, विराजसने सांगितला लग्नादरम्यानचा ‘तो’ किस्सा

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 

यावेळी शिवानी म्हणाली, “विराजसची आई म्हणजे मृणाल कुलकर्णी यांना अगोदरपासूनच आपली होणारी सून कोण आहे? हे माहिती होते. मी आणि विराजस कॉलेजपासूनच चांगले मित्र आहोत. अनेक नाटकात आम्ही एकत्र काम केलं आहे. आम्ही सतत एकमेकांबरोबर राहत असल्याने लोकांनी आम्हाला कपल म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली. आधी मित्र-मैत्रिणी त्यानंतर कुटुंबियांनी असा समज करुन घेतल्याने पुढे आम्हीही याचा गांभीर्याने विचार केला.”

“विराजस हा शिवानीला घेऊन कायम घरी यायचा. हा दरवेळी शिवानीलाच घरी का आणतो, असा प्रश्न त्यावेळी मृणाल कुलकर्णींना पडलेला असायचा. मी आणि मृणाल कुलकर्णी यांनीही अनेक प्रोजेक्टसमध्ये एकत्र काम केलं आहे. मृणाल कुलकर्णी यांना सर्वचजण संतूर मॉम असं म्हणाले. मी मात्र त्यांना सेटवर ताई असा आवाज द्यायची. याच नावाने मी त्यांना हाक देखील मारायचे.”

आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती?

“मला त्यांच्याकडे पाहिल्यावर काकू अशी हाक मारावं असं अजिबात वाटलं नाही. एका चित्रपटात मृणाल कुलकर्णींनी शिवानीच्या आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी सेटवर सर्वजण त्यांना ताई म्हणून हाक मारायचे. नाटकादरम्यान काम करतानाही ताई हे अंगवळणी पडलं होतं. विराजसशी लग्न झाल्यानंतर मी त्यांना काय हाक मारु, असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी अनेकदा मी गप्प बसायचे. त्यावेळी विराजसची आई मृणाल कुलकर्णी यांनी तू मला ताई म्हण, मला त्याचं काहीच वाटणार नाही, असं सांगितलं. यामुळेच मी आजही मृणाल कुलकर्णी यांना ताई म्हणूनच हाक मारते. हे ऐकल्यावर अनेकांना वेगळ वाटतं”, असे शिवानीने म्हटलं.

दरम्यान विराजस आणि शिवानी ही जोडी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. त्या दोघांचा विवाहसोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडला होता. त्यावेळी दोघांनीही दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा केली होती. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी विराजस-शिवानी विवाहबंधनात अडकले.