scorecardresearch

Premium

शिवानी सुर्वेला दोन-तीन दिवसांतच ‘या’ लोकप्रिय हिंदी मालिकेतून टाकलं होतं काढून, अभिनेत्री स्वतः किस्सा सांगत म्हणाली…

‘त्या’ लोकप्रिय हिंदी मालिकेतून शिवानी सुर्वेला का काढून टाकलं होतं? जाणून घ्या…

Actress Shivani Surve was removed from the Hindi popular serial after two-three days
'त्या' लोकप्रिय हिंदी मालिकेतून शिवानी सुर्वेला का काढून टाकलं होतं? जाणून घ्या…

अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात शिवानीने मनाली ही भूमिका साकारली असून तिच्या कामाचं कौतुक होतं आहे. अशातच शिवानीने नुकत्याच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला एका लोकप्रिय हिंदी मालिकेतून काढून टाकलं होतं, याचा किस्सा सांगितला.

अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘देवयानी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने अनेक हिंदी, मराठी मालिका केल्या. मग तिने ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता तिचा ‘झिम्मा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतं आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने शिवानी सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवरील ‘दिल के करीब’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिचा अभिनय क्षेत्रातील सुरुवातीचा प्रवास आणि स्वप्न असं सर्व काही सांगितलं. शिवाय तिने ‘झी टीव्ही’वरील ‘अगले जन्म मोहे बिटिया कीजो’ मालिकेतून काढून टाकण्याचा किस्सा देखील सांगितला.

actress was in love with ravindra mahajani
लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”
akshay mhatre will play lead role in punha kartavya aahe
‘या’ लोकप्रिय हिंदी मालिकेच्या मराठी रिमेकमध्ये झळकणार अक्षय म्हात्रे, साकारणार मुख्य भूमिका, प्रोमो पाहिलात का?
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”

हेही वाचा – ‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम दिव्या पुगावकरने लग्नाविषयी केलं भाष्य; अभिनेत्री म्हणाली, “लवकरच…”

शिवानी म्हणाली, “मी आठवीत असताना माझं नाटकं बघून माझी एका मालिकेसाठी निवड झाली होती. ‘झी टीव्ही’वरील ‘अगले जन्म मोहे बिटिया कीजो’ या मालिकेसाठी माझी निवड झाली होती. माझ्या आईचा एक नियम होता, दहा दिवस असेल तर शूटिंग करायचं, नाहीतर शूटिंग करायचं नाही. यात कोणतीही तडजोड करायची नाही. त्यावेळेस मी अभिनय क्षेत्रात खूप नवीन होते. घरी असं कोणीही नव्हतं की, जे मला सांगतील, कसं काम करायचं? कॅमेरा कसा फेस करायचा?”

हेही वाचा – माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं काय करतात? अभिनेत्री स्वतः सांगत म्हणाली…

“त्यानंतर माझ्याकडून चांगलं काम झालं नाही त्यामुळे त्यांनी मला दोन ते तीन दिवसांत काढून टाकलं. याच मला खूप वाईट वाटलं. पण त्याच्यानंतर मी म्हटलं आपण ऑडिशन देत राहू. यादरम्यान त्याचं मालिकेच्या निर्मात्यांनी मला फोन केला आणि काम केलेल्या दिवसांचा चेक घेण्यासाठी बोलावलं. मला कसंतरी वाटतं होतं. कारण एकत्र आपल्याला मालिकेतून काढून टाकलंय, आपण काम चांगलं केलं नाहीये, आपण कशाला पैसे घ्यायला जायचं. त्यामुळे मी एक-दोन महिने गेलेच नाही. मग त्यांचा पुन्हा फोन आला तुमचा चेक घेऊन जा, असं सांगितलं. त्यानंतर मी चेक घेण्यासाठी गेले,” असं शिवानीने म्हणाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress shivani surve was removed from the hindi popular serial after two three days pps

First published on: 04-12-2023 at 11:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×