Shraddha Arya Announces Pregnancy : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. आता तिच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने गुड न्यूज शेअर केली आहे. छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्याने रविवारी (१५ सप्टेंबर) इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओतून तिने ती गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली.

श्रद्धा लग्नाच्या तीन वर्षांनंतर पती राहुल नागलबरोबर तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. ही बातमी ऐकल्यावर तिचे इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी व चाहते सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स करून तिचे अभिनंदन करत आहेत.

Tanuj Virwani-Tanya Jacob blessed with baby girl
रणवीर-दीपिकानंतर ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याच्या घरी लेकीचं आगमन, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
actress Sana Sayyad Announces Pregnancy
एकाच मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, बेबी बंपचे फोटो केले शेअर, तीन वर्षांपूर्वी केलंय लग्न
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Vivek Oberoi shifted to Dubai
तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”
Raha Kapoor talking to dadi Neetu Kapoor video viral
Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून खूश झाली आलिया-रणबीरची लेक, म्हणाली…
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून खूश झाली आलिया-रणबीरची लेक, म्हणाली…

श्रद्धाने शेअर केला सुंदर व्हिडीओ

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये श्रद्धा व तिचा पती राहुल यांचा बीचवरील रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. एका आरशात दोघांचे प्रतिबिंब दिसत आहेत. यात श्रद्धाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. यासोबतच आरशाजवळ प्रेग्नेंसी किट ठेवली आहे, जी पॉझिटिव्ह आहे. त्याचबरोबर तिथे सोनोग्राफीचा फोटोही ठेवला आहे. “We Are Expecting A Little Miracle!” असं कॅप्शन देत श्रद्धाने हा फोटो शेअर केला आहे.

श्रद्धा व राहुलच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

‘कुंडली भाग्य’मधील प्रीताच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट्स करून तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. या पोस्टवर अभिनेत्री रश्मी देसाईने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. कनिका मानने दोघांना शुभेच्छा दिल्या. ‘कुंडली भाग्य’मध्ये श्रद्धाच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजुम फकीह हिनेही दोघांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तीन महिन्यांच्या मुलाला पाहिलंत का? पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, पाहा खास Photos

युविका चौधरी, निशा रावलसह अनेक स्टार्सनी अभिनेत्रीचे अभिनंदन केले आहे. सेलिब्रिटींव्यतिरिक्त श्रद्धाचे चाहते देखील व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

बेबी बंप लपवताना दिसली होती श्रद्धा

नुकतीच श्रद्धा एकता कपूरच्या गणपतीच्या सेलिब्रेशनला गेली होती. त्यावेळी तिने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती. पण ती तिच्या साडीच्या पदराने बेबी बंप लपवताना दिसली होती. त्यानंतर ती पतीबरोबर शहरात एका रेस्टॉरंटबाहेर दिसली होती, तेव्हाही तिने तिचा बेबी बंप पर्सने लपवला होता.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

अभिनेत्रीने तीन वर्षांपूर्वी केलं लग्न

अभिनेत्री श्रद्धा आर्या व राहुल नागल यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. श्रद्धा अभिनयक्षेत्रात काम करत आहेत, तर तिचा पती राहुल नौदल अधिकारी आहे. दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आता तीन वर्षांनी हे दोघेही आई-बाबा होणार आहेत.