‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच श्रेया बुगडेला १२ वा लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनचा मृदगंध पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
श्रेया बुगडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात सभारंभाचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत. यातील काही फोटोत ती पुरस्कार स्वीकारताना पाहायला मिळत आहे. तिने काही फोटोही शेअर केले आहेत. याला तिने कॅप्शन देताना आभार मानले आहे.
आणखी वाचा : “कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…” श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
श्रेया बुगडेची पोस्ट
“काही काही क्षण मी कलाकार आणि माणूस म्हणून खूप नशीबवान असल्याची जाणीव करून देतात …हा त्यापैकीं एक ….
ह्या वर्षी चा १२ वा लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशन चा ‘मृदगंध’पुरस्कार’ 2022′-नवोन्मेष प्रतिभा ‘ हा पुरस्कार मिळाला .. लोकशाहीर विठ्ठल उमप यांसारख्या थोर कलाकाराच्या नावाने असलेल्या पुरस्काराबरोबर माझं नाव जोडलं गेलं , ज्याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही !व्यासपीठावर जे माझे सह पुरस्कर्ते होते त्याच्या बरोबर उभं सुद्धा राहण्यास मी स्वतःला पात्र समजत नाही .. पण नंदेश दादा सरिता वाहिनी तुमचे खूप आभार इतकं प्रेम आणि सन्मान दिल्याबद्दल हा पुरस्कार मा .श्री सुधीर मुनगंटीवार. वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी चे नेते मा . श्री आशिष शेलार ह्यांच्या हस्ते देण्यात आला .
माझे सह पुरस्कर्ते
फ .मुं .शिंदे (जीवनगौरव )
पद्मश्री डॉ रवींद्र आणि स्मिता कोल्हे (सामाजिक क्षेत्र )
संजय मोने आणि सुकन्या मोने (अभिनय )
रवींद्र साठे (संगीत)
कमलाबाई शिंदे (लोककला)
ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांचे आहे. लोभ आहेच,तो वृद्धिगंत व्हावा !!”, अशी पोस्ट श्रेया बुगडेने केली आहे.
आणखी वाचा : “तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
दरम्यान झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. याच कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे ही प्रसिद्धीझोतात आली आहे.