लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री स्मृती खन्ना दुसऱ्यांदा आई होणार आहे. ती व गौतम गुप्ता पुन्हा एकदा आईबाबा होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. स्मृती आणि गौतम दुसऱ्यांदा पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीसह सुंदर फोटोशूट केलं आहे.

‘मेरी आशिकी तुमसे ही’ फेम अभिनेत्रीने तिचा बेबी बंप दाखवत काही फोटो शेअर केले आहेत. यात ती मुलगी अनायका व पती गौतम गुप्ताबरोबर दिसत आहे. आनंदी कुटुंबाचे फोटो शेअर स्मृतीने लिहिलं, “आमचे कुटुंब आता वाढणार आहे. आमची मुलगी अनायका आता मोठी बहीण होणार आहे. या दिवसाची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप काही सहन केलं आहे. ही आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचं दुसरं बाळ लवकरच येणार असून आम्ही त्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत.

Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

स्मृती २४ सप्टेंबर रोजी दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तिने ही पोस्ट शेअर केल्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेच्या सेटवर स्मृती व गौतम गुप्ता यांची भेट झाली होती. त्यांनी २०१७ मध्ये लग्न केलं आणि २०२० मध्ये लेक अनायकाचं स्वागत केलं होतं.

स्मृतीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘ये है आशिकी’, ‘बालिका वधू’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. स्मृती पंजाबी चित्रपट ‘जट ऑलवेज’मध्ये झळकली होती. सध्या तिने कामातून ब्रेक घेतला असून ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.