‘इश्क का रंग सफेद’ मालिकेतील अभिनेत्री स्नेहल रायने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता. स्नेहलने वयाच्या २३ व्या वर्षी तिच्यापेक्षा २१ वर्षांनी मोठे असलेल्या राजकीय नेत्याशी लग्न केलं. तिच्या पतीचं नाव माधवेंद्र राय आहे. स्नेहल व माधवेंद्र यांच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. स्नेहलने १० वर्षांपर्यंत तिच्या लग्नाची बातमी लपवून ठेवली होती.

“मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

स्नेहलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बाळ गमावल्याचा खुलासा केला. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहलने सांगितलं की लग्नानंतर लवकरच ती एका मुलाची आई झाली पण आजारपणामुळे तिने मुलाला गमावले. “लग्नानंतर मला एक मुलगा झाला, तो चार महिन्यांचा असताना एका आजारामुळे आम्ही त्याला गमावले. त्याचे नाव रुद्र होते. त्याच्या आठवणीत मी रुद्रकल्प क्रिएशन्स ही एनजीओ सुरू करणार आहे. माझा मुलगा जिथे असेल, ती जागा खूप सुंदर असेल, अशी मला आशा आहे,” असं स्नेहल म्हणाली.

गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर, लेकीच्या आडनावाच्या वादावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

स्नेहल पुढे म्हणाली, “मी स्वतःला आठवडाभर खोलीत कोंडून घेतलं होतं. मी वॉशरूममध्ये जायचे व माझ्या बेडवर बसून राहायचे. मी जेवायचे नाही. माझ्यासाठी माझं आयुष्य संपलं होतं. माझ्या दु:खाला अंत नव्हता. जेव्हा तुम्हाला वाटतं की आयुष्यात सर्वकाही चांगलं चाललं आहे, तेव्हा सगळं उलटं होऊ लागतं. एक मूल गमावणं शंभर मृत्यूंसारखं आहे. माझा एक मित्र होता, ज्याने मला यातून बाहेर पडण्यास मदत केली. माझे वजन ४० किलो झालं होतं, माझ्या शरीराचा सांगाडा झाला होता. मला वाटायचं की मेकअप करणं पाप आहे, जगाला चेहरा कसा दाखवायचा? असा प्रश्न मला पडायचा. माझी मैत्रीण मला आवरून मरीन ड्राईव्हला घेऊन जायची, रडायला सांगायची आणि व्यक्त हो म्हणायची. एकदा मी एका अनाथाश्रमात गेले आणि एका मुलाने मला मिठी मारली आणि ‘आई’ म्हटलं. त्या घटनेनंतर मला पुन्हा आयुष्य जगण्याची इच्छा निर्माण झाली.”

स्नेहल तिच्या लग्नाबद्दल व पतीबरोबर असलेल्या वयाच्या अंतराबद्दल म्हणाली, “वयात अंतर असूनही आम्ही आनंदी आहोत. बाळ गमावल्यानंतर त्यांनी मला खूप सांभाळलं. ते कामात व्यग्र असायचे, पण व्हिडीओ कॉलवरच्या माध्यमातून नेहमी माझ्यासोबत असायचे. त्यांनी मला स्वतःला व्यग्र ठेवण्यास सांगितलं. त्यावेळी मी अनुपम खेर यांच्या अभिनयाच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. मला असं वाटतं की मी माझ्या लग्नाबद्दल कधीच बोलले नाही, कारण प्रत्येकाला मुलं होण्याची अपेक्षा असते. माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता. पण, आता मी मजबूत झाले आहे, त्या गोष्टी मी शेअर करू शकते. त्यामुळेच मी माझ्या लग्नाबद्दलही खुलासा केला.”