actress snehalata vasaikar shared her daughter and nilesh sabale incidence in bigg boss marathi house | Loksatta

“निलेश साबळेने माझ्या लेकीचा फोटो…” स्नेहलता वसईकरने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सांगितला ‘तो’ प्रसंग

Bigg Boss Marathi 4: स्नेहलता वसईकरने सांगितली मुलगी व निलेश साबळेची आठवण

snehalata vasaikar on nilesh sabale
स्नेहलताने बिग बॉसच्या घरात निलेश साबळेची आठवण सांगितली. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात अभिनेत्री स्नेहलता वसईकरही सहभागी झाली आहे. स्नेहलताने वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी स्नेहलता एक आहे. तिचा खेळही प्रेक्षकांना आवडतो.

स्नेहलताचा ‘बिग बॉस’च्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. स्नेहलताच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्नेहलता अमृता धोंगडेशी गप्पा मारताना दिसत आहे. स्नेहलताला ‘शौर्या’ ही मुलगी आहे. या व्हिडीओमध्ये तिने अभिनेता निलेश साबळे व तिच्या मुलीची एक आठवण सांगितली आहे.

हेही वाचा>> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

स्नेहलता म्हणते, “जेव्हा निलेश साबळेची पत्नी गरोदर होती. तेव्हा त्याने व त्याच्या पत्नीने मोबाईलवर स्क्रीनसेव्हर म्हणून माझ्या मुलीचा शौर्याचा फोटो ठेवला होता. तो प्रार्थना करत होता की त्याला मुलगी झाली तर ती शौर्यासारखी असावी. निलेशने जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मला माझ्या मुलीबद्दल फार गर्व वाटला. माझ्यासाठी हा क्षण फार अभिमानास्पद होता. मुलगी म्हणून मला तिचं कौतुक आणि आई म्हणून गर्व वाटायला लागला”.

हेही वाचा>> “अंड्याची भुर्जी अन्…” राखी सावंतसह तीन सदस्यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दणक्यात एन्ट्री

हेही वाचा>> Video: “मी अवली लवली…” हास्यजत्रेतील ‘कोहली’ फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

“तुझी मुलगी खूप गोड आहे, तिची नजर काढ असे खूप जणांनी मला मेसेजही केले होते. माझ्या मुलीचा जन्म २ नोव्हेंबरचा आहे. तिच्या वडिलांनी जेव्हा तिला हातात घेतलं तेव्हा शौर्याने त्याला डोळा मारला होता”, असंही पुढे स्नेहलता म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 15:19 IST
Next Story
“अंड्याची भुर्जी व राखी सावंतची मर्जी, ए शेवंते” ‘बिग बॉस मराठीच्या’ घरात प्रवेश करताच ड्रामा क्वीनची डायलॉग बाजी, प्रेक्षक म्हणतात…