Premium

Video: ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये होणार मोठा बदल, स्पृहा जोशीच्या ऐवजी ‘ही’ अभिनेत्री दिसणार सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत

या कार्यक्रमाच्या चार पर्वांचं सूत्रसंचालन स्पृहा जोशीने केलं. पण आगामी पर्वामध्ये स्पृहा जोशी या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून दिसणार नाही.

Spruha Rasika

‘सूर नवा ध्यास नवा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाची पाच पर्व सुपरहिट झाली. तर आता लवकरच या कार्यक्रमाचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची नुकतीच घोषणा करण्यात आली. पण आता या आगामी पर्वामध्ये निर्मात्यांनी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सूर नवा ध्यास नवा’चं ‘सुर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ हे आगामी पर्व लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाच सूत्रसंचालन तेजश्री प्रधान हिने केलं. तर त्यानंतरच्या आतापर्यंतच्या पर्वांचं सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी हिने केलं. पण आगामी पर्वामध्ये स्पृहा जोशी या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून दिसणार नाही.

आणखी वाचा : “मराठी भाषेतून शिकणारी मुलं…”, स्पृहा जोशीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

‘ढोलकीच्या तालावर’ या रिॲलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. या दरम्यान पुढच्या आठवड्यापासून त्या जागी सुरू होणाऱ्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचं प्रमोशन करण्यात आलं. तर त्यावेळी या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार असल्याची घोषणा करण्यात आली. तर परीक्षकांच्या भूमिकेत अवधूत गुप्ते आणि महेश काळे दिसणार आहेत.

हेही वाचा : ‘सूर नवा ध्यास नवा’तील मॉनिटर आता दिसतो ‘असा’, दीर्घ काळानंतर झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत स्पृहा जोशी म्हणाली…

तर आता स्पृहा जोशीची जागा रसिका सुनीलने घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या कार्यक्रमातील स्पृहा जोशीच्या सूत्रसंचालनाचं नेहमीच कौतुक झालं. तर आता ती या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिका म्हणून दिसणार नसल्याने तिचे चाहते निराश झाले आहे. दरम्यान निर्मात्यांनी हा बदल का केला याचं कारण अजून समोर आलेलं नाही. ‘सुर नवा ध्यास नवा’चं हे आगामी पर्व ७ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress spruha joshi got replaced by rasika sunil as an anchor of sur nava dhyas nava show rnv

First published on: 02-10-2023 at 10:52 IST
Next Story
“आदल्या दिवशीचा चिकनचा रस्सा, शिळी भाकरी अन्…” दुबईत फिरणाऱ्या मराठी अभिनेत्याला येतेय मराठमोळ्या खाद्यपदार्थांची आठवण, म्हणाला…