scorecardresearch

Premium

“‘त्या’ घटनेनंतर आम्ही पळून जाऊन लग्न केलं”, आदेश बांदेकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाले, “सुचित्राला…”

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर यांची फिल्मी लव्हस्टोरी…

suchita bandekar and aadesh bandekar lovestory
सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी

आदेश आणि सुचित्रा बांदेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. सुचित्रा बांदेकर ‘रथचक्र’ या मालिकेत काम करत असताना दोघांची पहिली भेट झाली होती. पहिल्या नजरेतच आदेश बांदेकर त्यांच्या प्रेमात पडले होते. सुचित्रा यांच्या घरून त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींनी त्यांची फिल्मी लव्हस्टोरी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितली आहे.

हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरेंनी मला फोन केला अन्…”, आदेश बांदेकर यांचा ‘असा’ सुरू झाला राजकीय प्रवास; म्हणाले, “फक्त १३ दिवस…”

Pankaj Tripathi
“माफियाची भूमिका दिली, पण चित्रीकरणावेळी मला…”, पंकज त्रिपाठींनी सांगितला पदार्पणाचा किस्सा
adah-sharma
‘द व्हॅक्सिन वॉर’वर प्रतिक्रिया देण्यास अदा शर्माने दिला नकार; अभिनेत्रीने सांगितलं यामागील कारण
mrunmayee-deshpande
सुभेदार चित्रपटानंतर मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरीजमध्ये एन्ट्री; पोस्टर प्रदर्शित
marathi actress Nandita Patkar
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “एक सिक्रेट…”

होम मिनिस्टर कार्यक्रमाने २० व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे अलीकडेच आदेश बांदेकर यांनी ‘मुंबई तक’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नापूर्वीचे अनेक प्रसंग सांगितले. ते म्हणाले, “सुचित्रा दहावीत असताना मी नाटकाच्या दिग्दर्शनाचं काम पाहायचो. पुढे तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि आमच्या नियमित भेटीगाठी होऊ लागल्या. हळुहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि तोपर्यंत आमच्या प्रेमाची खबर घरच्यांपर्यंत पोहोचली होती. एके दिवशी रुपारेल कॉलेजच्या मागे एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो त्यावेळी मी पाठमोरा उभा असताना अचानक मागून सुचित्राचे वडील आले. ती म्हणाली, ‘दादा आले…’ तिचं वाक्य ऐकून मी तसाच थेट किचनमध्ये गेलो. तिच्या वडिलांनी हॉटेलमध्ये शोधाशोध करायला सुरूवात केली.”

हेही वाचा : ‘असा’ असेल अक्षरा-अधिपतीचा राजेशाही विवाह सोहळा, लग्नात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स समोर, घ्या जाणून

आदेश बांदेकर पुढे म्हणाले, “हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन मी एका वेटरचे कपडे घातले आणि त्यांनी बघायच्या आत तसाच बाहेर आलो. त्या हॉटेलमधून बाहेर आल्यावर मी रुपारेल कॉलेजकडे जीव घेऊन पळत सुटलो, असे अनेक प्रसंग आयुष्यात घडतात. पण, त्यानंतर सगळं नीट झाल्यावर सुचित्राच्या आई-वडिलांनी माझ्यावर जे प्रेम केलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. आता तिची आई आमच्या घरी राहते…माझी आई गेल्यावर सुचित्राच्या आईने आमच्या घराचं सगळं ममत्व जपून ठेवलंय.”

हेही वाचा : मराठमोळ्या केतकी माटेगावकरचं नशीब उजळलं; सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर झळकली जाहिरातीत, अनुभव सांगत म्हणाली…

“रुपारेल हॉटेलचा प्रसंग घडल्यावर बरोबर १५ दिवसांनी सुचित्राला १८ वर्ष पूर्ण होणार होती. घडलेला प्रकार पाहिल्यावर वडील चिडणं स्वाभाविक होतं. पण, सुचित्राचं प्रचंड प्रेम आणि विश्वास होता. त्या घटनेनंतर बरोबर १५ दिवसांनी सुचित्राला १८ वर्ष पूर्ण झाली. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर १ महिन्याची रितसर नोटीस द्यावी लागते ती आम्ही दिली आणि १४ नोव्हेंबर १९९० ला आम्ही दोघांनी पळून लग्न केलं.” असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress suchitra bandekar and actor aadesh bandekar filmy lovestory sva 00

First published on: 29-09-2023 at 19:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×