मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही महिन्यात नवीन गाडी खरेदी केल्या. गेल्या काही महिन्यांमध्ये चेतना भट, सई ताम्हणकर, अनिता दाते, संतोष जुवेकर या मराठी कलाकारांनी आलिशान गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केली. आता या यादीत आणखी एका मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.

नायिका असो किंवा सर्वांना त्रास देणारी खलनायिका, कधी गोड तर कधी खाष्ट सासू अशा विविधांगी भूमिका साकारून अभिनेत्री सुलेखा तळवलकर घराघरांत लोकप्रिय झाल्या. त्यांचा छोट्या पडद्यावरील चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या सुलेखा तळवलकर त्यांच्या युट्यूब चॅनेलमुळे चर्चेत असतात. 

मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी नुकतीच नवीन गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा : “मतदानासाठी ६ तासांचा प्रवास करून आले, पण…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री का झाली नाराज? पोस्ट शेअर करत म्हणाली…

गाडीची पहिली झलक शेअर करत सुलेखा तळवलकर लिहितात, “माझं गाड्यांवर असलेलं प्रेम! ड्रायव्हिंग ही माझी आवड आहे आणि गाड्या म्हणजे माझं प्रेम, माझी कमजोरी आहे. कपड्यांनी भरलेल्या वॉर्डरोबपेक्षा गाड्यांचं वॉर्डरोब असावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळेच आमच्या कुटुंबात आता आम्ही आणखी एक सदस्य जोडला आहे. वेलकम होम…तुझी आम्ही खूप काळजी घेऊ ( नव्या गाडीला उद्देशून )…ही पोस्ट करायला थोडा उशीर जाला तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद”

हेही वाचा : “निवांत अर्धा तास गप्पा अन्…”, Cannes निमित्ताने छाया कदम यांची ए.आर. रेहमान यांच्याशी झाली खास भेट, फोटो शेअर करत म्हणाल्या…

सुलेखा तळवलकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “मनःपूर्वक अभिनंदन ताई… मस्त कार आहे”, “अभिनंदन मॅडम”, “तुमचा खूप अभिमान वाटतो” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर आल्या आहेत.

हेही वाचा : थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

हेही वाचा : Video: पहिल्यांदाच दिसला दीपिका पादुकोणचा बेबी बंप; मतदानानंतर गर्दीत पत्नीची काळजी घेताना दिसला रणवीर सिंग

दरम्यान, सुलेखा तळवलकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. यामध्ये त्यांनी सीमा मुकादम हे पात्र साकारलं आहे.