यंदाचा गणेशोत्सव हा कलाकार मंडळींसाठी खूप खास आहे. काही कलाकारांनी लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवाचा आनंद चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. अभिनेत्री पूजा सावंतने लग्नानंतरच्या पहिल्या गणपती सणासाठी मायदेशी परतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच आता अभिनेत्री सुरुची अडारकर हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गणरायांच्या आगमनानिमित्ताने मोदक करत असताना व्हिडीओ सुरुचीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुची आणि तिचा पती अभिनेता पियुष रानडे हे दोघे एकत्र मिळून बाप्पासाठी खास उकडीचे मोदक करताना दिसत आहेत. सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा या जोडप्याचा हा पहिला गणेशोत्सव आहे. खास या सणासाठी सुरुचीने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा- भारतात परतल्यावरचा मृणाल दुसानिसचा पहिला गणेशोत्सव, स्वतःच्या नऊवारी साडीचा वापर करून केली सजावट, म्हणाली…

अभिनेत्री सुरुची अडारकरने कॅप्शनमध्ये लिहिलं, “बाप्पा, तुझ्या येण्याने सुख, समृद्धी, आरोग्य, शांती लाभले आहे. असंच सगळ्यांनी आनंदी आणि समाधानी राहावं हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तुझा आशीर्वाद असाच कायम असू दे”. त्यानंतर तिने तिच्या पतीबद्दलच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. “तू माझ्या आयुष्यात बाप्पाचा आशीर्वाद आहेस. प्रत्येक प्रसंगात तू कायम माझ्या बरोबर उभा असतोस. सगळी कामं बरोबरीने वाटून करतोस. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगला वाईट क्षण तू वाटून घेतोस आणि म्हणूनच मी तुझ्यावर खूप प्रेम करते,” असं कॅप्शन तिने पतीसाठी लिहिलं.

हेही वाचा- Video: “बिग बॉस तुम्ही मला जमिनीवर…”, निक्की तांबोळीचं वक्तव्य ऐकताच वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “जनतेला तुझं…”

अभिनेत्री सुरुची अडारकरने मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र तिला लोकप्रियता मिळाली ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे. त्यानंतर सुरुची ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘अंजली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. मालिकेतील सुरुची आणि पियुष या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली होती.