scorecardresearch

Premium

वर्षभराच्या ब्रेकनंतर विशाखा सुभेदार करणार मालिकेत पुनरागमन, प्रोमो समोर

विशाखा सुभेदार ही लवकरच एका मालिकेद्वारे पुनरागमन करणार आहे.

Shubh Vivah vishakha subhedar

अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला कायमच विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाते. तिने कायमच मराठी मालिका आणि चित्रपटातून आपला ठसा उमटवला आहे. विशाखा सुभेदारने ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या कुर्रर्रर्रर्र या नाटकात व्यस्त आहे. यानंतर आता विशाखा सुभेदार ही पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनी ही कायमच दर्जेदार मालिकांसाठी ओळखली जाते. स्टार प्रवाह वाहिनीने लाखो प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. येत्या नवीन वर्षात स्टार प्रवाहवरील अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाखा सुभेदार ही लवकरच एका मालिकेद्वारे पुनरागमन करणार आहे.
आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद मिटणार? ‘झी वाहिनी’कडून मोठा निर्णय; परिपत्रक केलं जारी

Nava Gadi Nava Rajya
Video: “काय मूर्खपणा आहे…,” ‘नवा गडी नवं राज्य’च्या ट्रॅकला वैतागले प्रेक्षक, म्हणाले, “भारत चंद्रावर पोहोचलाय आणि यांनी…”
The name is enough Yuzvendra Chahal said a big thing by tweeting about Ravichandran Ashwin's bowling
Yuzvendra Chahal: आर. अश्विनची दमदार कामगिरी अन् चहलची पोस्ट आली चर्चेत; म्हणाला, “फक्त हे नावच…”
actor mohammed zeeshan ayyub
‘दबावापुढे न झुकण्याची भूमिका घ्यायला हवी’
premachi goshta trp list
तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ने टीआरपीत मारली बाजी, ‘ठरलं तर मग’ मालिकेला टाकलं मागे, पाहा संपूर्ण यादी

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शुभविवाह असे या मालिकेचे नाव आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट यात दाखवली जाणार आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.

विशाखा सुभेदारने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मालिकेचा प्रोमो पोस्ट केला आहे. “येतेय लवकरच.. “शुभविवाह ” घेऊन.. तुमच्या आशीर्वादाने,पुन्हा एकदा मालिकेच्या जगात,एका वेगळ्या भूमिकेत.. मायबाप प्रेक्षक..प्रेम राहू दया. चि. सौ. कां. भूमी आणि चि. आकाश यांचा ‘शुभविवाह’ मुहूर्ताची वेळ: सोमवार १६ जानेवारीपासून रोज दुपारी २:०० वाजता स्थळ: Star प्रवाहवर लग्नाला यायचं हं!” असे कॅप्शन तिने या प्रोमोला दिला आहे.

आणखी वाचा : महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल, बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

यात विशाखा सुभेदार ही दोन मुलांची आई असलेले पात्र साकारत आहे. यात तिच्या पात्राचे नाव काय असणार? या मालिकेत ती सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेत असणार की नाही? याकडे लक्ष असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress vishakha subhedar comeback in marathi serial shubh vivah promo viral nrp

First published on: 14-12-2022 at 21:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×