scorecardresearch

Video: आधी तक्रार दिली अन् आता तुरुंगात राखी सावंतने घेतली पतीची भेट; म्हणाली, “आदिल माझ्याशी खूप…”

आदिलने मारहाण केल्याचा आरोप करत राखीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि सध्या तो कोठडीत आहे.

rakhi sawant adil khan (1)
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ड्रामा क्वीन राखी सावंतचं वैवाहिक आयुष्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. अभिनेत्रीने आठ महिन्यांपूर्वी आदिल खान दुर्रानीशी गुपचूप लग्न उरकलं होतं. हे लग्न तिने डिसेंबरपर्यंत लपवून ठेवलं होतं. पण, तिला आदिलच्या अफेअरबद्दल कळताच तिने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.

“पुरुषांसाठी नेहमीच…”, बॉलिवूडबाबत शर्मिला टागोर यांचं मोठं विधान, अमिताभ बच्चन यांचाही केला उल्लेख

राखीने स्वतःचं नाव आणि धर्म बदलत आदिलबरोबर इस्लाम पद्धतीने लग्न केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांमधील वाद सुरू झाले आणि आदिलने मारहाण केल्याचा आरोप करत राखीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि सध्या तो कोठडीत आहे. अशातच राखीने त्याची भेट घेतल्याचं म्हटलंय. आदिल धमकी देत असल्याचा आणि तो आपल्याशी नीट बोलत नसल्याचं राखीने म्हटलं आहे.

बिरबलाच्या भूमिकेतील फर्स्ट लूकमुळे सुबोध भावे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अरे देवा…”

अलीकडेच माध्यमांशी बोलताना राखी म्हणाली, “मी त्याला भेटले, जे काही घडलं त्याबद्दल मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला विचारलं की तू कार घेतलीस का? त्यावर हा तुझा प्रश्न नसल्याचं आदिल म्हणाला. तो माझ्याशी खूप वाईट पद्धतीने बोलत आहे. तू मला तुरुंगात टाकलंस यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. १ कोटी ६० लाख रुपयांचं तू काय केलंस? असं मी त्याला विचारलं. त्यावर मी तुला उत्तर देऊ की पोलिसांना, असं तो म्हणाला,” असं राखीने सांगितलं.

दरम्यान, राखीने आदिलवर तिच्या गाड्या घेतल्याचे, तिच्या पैशांचा गैरवापर केल्याचे आणि आईचे दागिने विकल्याचे आरोप केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 09:01 IST